शहिद जवान राजेश्वर भुरे यांचे स्मरण करून नृसिंह गणेश मंडळाचे विसर्जन -NNL


उस्माननगर, माणिक भिसे।
येथून जवळच असलेल्या मौजे शिराढोण ता.कंधार  येथे दि.09 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीनिमित्त श्री नृसिंह गणेश मंडळाने शहिद जवान राजेश्वर आनंदराव भुरे यांचे स्मरण करून गणेश मंडळाचे विसर्जन केले.

उस्माननगर येथून जवळच असलेल्या मौजे  शिराढोण ता.कंधार  येथील वीर जवान शहीद राजेश्वर आनंदराव भुरे हे नुकतेच कर्तव्यावर असताना शहीद झाले. त्यामुळे शिराढोण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला राजेश्वर भुरे हे सर्व मित्र परिवार मध्ये मिळून मिसळून बंधूत्वाने राहून सण उत्साहात सहभागी होत आसत.

शहीद जवान भुरे हे मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार असलेल्या नृसिंह गणेश मंडळाने यंदाचे गणेश विसर्जन आपल्या शहीद मित्राच्या आठवणी मनात साठवून त्याचे स्मरण म्हणून गणेश मंडळाच्या मिरवणुकीत बॅनर लावून देशभक्तीपर गाणे लावून गावातील मुख रस्त्याने मिरवणूक काढून नृसिंह गणेश मंडळाचे विसर्जन केले. यावेळी उपस्थित मंडळाच्या सर्व सदस्यांनी समस्त भुरे परिवार व गाववासियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी केली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी