वंचित बहुजन आघाडीच्या हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी धम्मपाल वाढवे यांची निवड -NNL


हिमायतनगर।
वंचित बहुजन आघाडीची दिनांक 16 सप्टेंबर रोजी एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत सर्वानुमते हिमायतनगर तालुक्याची नूतन कार्यकारणी पुनर्गठीत करण्यात आली त्यामध्ये हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी धम्मपाल वाढवे यांची निवड करण्यात आली असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे सांगितले आहे.

हिमायतनगर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद आगामी काळात निर्माण करण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर यांच्या आदेशावरून हिमायतनगर तालुक्याचा विस्तार करण्यासाठी 16 सप्टेंबर रोजी भैय्यासाहेब आंबेडकर परीक्षण केंद्र उल्हासनगर नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये हिमायतनगर तालुका कार्यकारणी घोषित करण्यात आली त्यात हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी धम्मपाल वाढवे यांची निवड करण्यात आली.

महासचिव अड्र. शेख जब्बार सरसमकर, सुनील गौतम गोडगे महासचिव कारला ,प्रकाश भिमराव वाठोरे उपाध्यक्ष शिरंजनी, संतोष यशवंतराव खिल्लारे धानोरा, संभाजी विठ्ठलराव राऊत पवना, विशाल लक्ष्मण हानवते हिमायतनगर ,गणेश पांडुरंग मुनेश्वर बोरगाव ,संजय दत्तराव राऊत सवना,आकाश आनंदा कदम वारगटाकळी ,वैभव प्रकाश नरवाडे कामारी ,राजरत्न सुरेश राऊत पवना, राहुल गोविंद तुळसे धानोरा ,अविनाश नारायण कदम पोटा, बाळासाहेब यशवंत सावते वडगाव, योगेश रावसाहेब लव्हाळे पारवा,अमोल दिलीपराव वाडेकर पळसपुर, शरद केरबाजी हनवते खडकी, स्वप्निल प्रकाश हनवते हिमायतनगर, चंद्रकांत दिगंबर काळबांडे आंदेगाव ,गोविंद गोखले सरसम, भूमना यल्लाप्पा मिरेवाडी आंदेगाव,शेख एस्ताक सरसम, सतीश भुसावळ आंदेगाव, अरुण साहेबराव सावते दिघी, सुभाष गोपने मंगरूळ, सिद्धार्थ वाठोरे मंगरूळ सह विशाल राऊत पारडी यांची वंचित बहुजन आघाडीच्या विविध पदावर निवड करण्यात आल्याचे पत्र प्रदेशअध्यक्ष रेखा ठाकूर यांनी दिले आहे.

त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची ताकद मोठ्या संख्येने पाहायला मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. असी माहिती वंचित बहुजन आघाडी चे प्रसिद्धी प्रमुख स्वप्नील हनवते यांनी दिली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी