किनवट ते श्रीक्षेञ माहुरगड पर्यंत 11 आक्टोबर रोजी जय श्रीराम पद याञा -NNL


किनवट, माधव सूर्यवंशी|
किनवट ते श्रीक्षेञ माहुरगड आशी पदयाञा मंगळवार दि.11 आक्टोबर रोजी सकाळी पाच वाजता गजानन माहाराज मंदिरा समोरुन वेद मूर्ती दिनेश माहाराज कुलकर्णी संभाजीनगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जय श्रीराम पद याञा संयोजन समीतीच्या वतीने आयोजीत करण्यात आली आहे आशी माहीती नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी दिली .                   

प्रति वर्षा प्रमाणे या वर्षी ही आश्वीन वद्य द्वितीया मंगळवार दि.आकरा आक्टोबर रोजी सकाळी पाच वाजता श्रीफळ वाढवुन या पदयाञेला प्रारंभ होणार आहे शहरातुन भव्य मीरवणुक काढून घोटी राजगड निचपूर वानोळा दत्तमांजरी मार्गे राञी दाहा वाजता ही पद याञा दत्त शीखर यथे पोहचनार आहे 12 आक्टोबर रोजी सकाळी सात वाजता दत्त प्रभुचे दर्शन शीखर संस्थांचे महंत माहाराज यांची पाद्दपूजा दर्शना नंतर सकाळी दाहावाजता ही पद याञा रेणुका माता मंदीर पोहचुन मातेची माहा आरती व प्रसादा नंतर ही पद याञा किनटला परतीच्या प्रवासाला निघणार आहे.

" कलौ चंडी विनायको "  याशास्ञा प्रमाणे कली युगात चंडी उपासना व पद याञा फलद्रुप होते यातुन रेणुका मातेची उपासना होते या उद्देशाने या पद याञेचे आयोजन करण्यात  आले देव धर्म अन देश याचे संरक्षण व्हावे तरुण पिढी व्यसना पासुन दूर राहावी या साठी या पद याञेत  युवकानी अन महीला भगीणी पुरुष बांधवानी पद याञेचा आनंद घेण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहण श्रीराम पद याञा समीतीने केल आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी