मुख्यमंत्र्यांनी पोखरभोसी येथील प्रगतिशील शेतकऱ्यांबरोबर दिवाळी केली साजरी -NNLउस्माननगर, माणिक भिसे| महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी पोखरभोसी तालुका लोहा येथील प्रगतिशील शेतकऱ्यांबरोबर दिवाळी साजरी केली.

नांदेड जिल्ह्यात नाविन्यपूर्ण शेतीमध्ये प्रयोग साकार व शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे पोखरभोसी तालुका लोहा येथील प्रगतिशील शेतकरी संजय ताटे यांच्यासह अनेक प्रगतीशील शेतकऱ्यांच्या  भाजीपाला बीज उत्पादनातील मास्टर म्हणून ओळख असणाऱ्या शेतकऱ्यांच्या  बीजोत्पादन कार्याची दखल घेऊन  जिल्हा कृषी अधिकारी यांनी कृषी मंत्रालयात नावांची शिफारस केली होती. पाठवलेल्या नावातील एकमेव प्रगतिशील शेतकरी म्हणून पोकरभोसीचे  संजय ताटे यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगाची दखल घेऊन व बीजोत्पादन कार्यशाली पाहून त्यांची निवड करण्यात आली होती.


दीपावली निमित्त राज्यभर प्रकाशपर्व साजरे होत असताना आज 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी राज्यातून आलेल्या शेतकरी कुटुंबियांसोबत सहकुटुंब  दिवाळी साजरी केली. याप्रसंगी शेतकरी बंधू भगिनींना दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांच्यासोबत फराळाचा आस्वाद घेतला. आलेल्या प्रत्येक शेतकरी कुटुंबाचे औक्षण करीत त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. 


 राज्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि कृती विकास आराखडा तयार करीत असल्याचे यासमयी सांगतानाच नैसर्गिक आपत्तीत सरकार तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्ही धीर सोडू नका. राज्य शासन तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही दिली. राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यातून प्रातिनिधिक स्वरुपात शेतकरी बांधव सपत्निक या अनोख्या सोहळ्याला उपस्थित होते. पहिल्यांदाच अशा स्वरुपाची दिवाळी वर्षा येथे साजरी झाल्याचे अनेकांनी याप्रसंगी सांगितले.

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील पोखरभोसी येथील संजय ताटे व त्यांच्या पत्नी पार्वती ताटे यांची निवड करण्यात आली होती. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, प्रकल्प उपसंचालक श्रीमती माधुरी सोनवणे, तालुका कृषि अधिकारी लोहा संदानद पोटपेलवार, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सोहेल सय्यद यांनी प्रगतशील शेतकरी संजय ताटे यांना वर्षा' या शासकीय निवासस्थानी घेऊन जायचे नियोजन केले.

याप्रसंगी मुख्यमंत्री साहेब यांच्या पत्नी सौ.लता, मुलगा खासदार डॉ.श्रीकांत, स्नुषा सौ.वृषाली यांनी प्रत्येक शेतकरी कुटुंबांचे औक्षण केले. त्यांना साडी- चोळी, धोतर आणि सदरा देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. संजय ताटे यांनी आपल्या लोहा तालुक्यातील प्रसिद्ध सिताफळ भेट दिली.याप्रसंगी कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आमदार प्रताप सरनाईक, आमदार प्रवीण दरेकर, माजी खासदार आनंद अडसुळ यांच्यासह सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, मदत व पुर्नवसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरजकुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे  आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सोहेल सय्यद आदी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी