त्या अंगणवाडी सेविकेस बडतर्फ करा....गावकयांची मागणी...NNL

आंगणवाडीचा पोषण आहार अफरातफरी करत असतांना गावकऱ्यांनी रंगेहात पकडून सुद्धा कारवाई नाही...गावकऱ्यांचा उपोषणाचा इशारा                       


किनवट,माधव सूर्यवंशी|
किनवट तालुक्यातील चिखली (ई) येथील दि.१० ऑक्टोबर रोजी अंगणवाडी सेवीकेने पोषण आहार अफरातफरी केलेल्या प्रकरणी महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी आश्विनी ठकरोड यांनी तात्काळ दि .१२ ऑक्टोबर रोजी कारवाई करत चार सदस्यांची समितीची  नेमणूक करून दि.१३ ऑक्टोबर रोजी चिखली येथे गावकऱ्यांच्या समक्ष चौकशीचे आदेश दिले होते.या अनुषंगाने समितीने दि.१३ ऑक्टोबर रोजी चौकशी करण्यात आली.या चौकशीत सदरील अंगणवाडी सेविकेच्या संपूर्ण काम करण्याचा पद्धतीवर गावकऱ्यांनी आक्षेप घेत पुन्हा एकदा गावकऱ्यांच्या वतीने निवेदने व तक्रार देत. अंगणवाडी सेविकेला बडतर्फ करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

या प्रकरणी चौकशीचे अहवाल काल दि.१४ ऑक्टोबर रोजी सादर करण्यात येईल असे अप्पारावपेठ अंतर्गत येणाऱ्या महिला व बालविकास प्रकल्पाच्या पर्यवेक्षीका यु.कंठेवाड यांनी सांगितले. अंगणवाडी सेविकेला आंगणवाडीचा पोषण आहार अफरातफरी करत असताना गावकऱ्यांनी रंगेहात पकडुन सुद्धा बडतर्फची कारवाई होत नाही.तर यात वरिष्ट अधिकाऱ्यांचे सुद्धा काही हात आहे काय ? असा सवाल गावकऱ्यांकडून होत आहे.आता या प्रकरणाचे काय होईल.याकडे चिखली गावकरी व शिवणी परिसरातील अंगणवाडी सेविकांचे लक्ष लागले आहे.तर दुसरीकडे सदरील महिलेला रंगेहात पकडल्यावर बडतर्फची कारवाई करणे अपेक्षित होते.गावकऱ्यां कडून संबधित अंगणवाडी सेविकेचा बडतर्फ करण्याची मागणी होत आहे.या प्रकरणी अंगणवाडी सेविकेला बडतर्फ करण्यात यावा अन्यथा नांदेड जिल्हा परिषदासमोर उपोषणास बसण्याचा गावकऱ्यांनी इशारा दिला आहे.  

दि.१० ऑक्टोबर रोजी चिखली (ई) येथील अंगणवाडी सेविकेने पोषण आहार अफरातफरी करतांना गावकऱ्यांनी पाठलाग करून शिवणी येथे रंगेहात पकडण्यात आले होते.या प्रकरणी गावकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी सदरील प्रकरणाच्या चौकशी साठी समिती गठन करण्यात आली होती. या समितीने दि.१३ ऑक्टोबर रोजी चिखली (ई) गावात जाऊन चौकशी केली असता या वेळी अनेकांनी सदरील अंगणवाडी सेविके विरुद्ध तक्रारी निवेदन दिले. आता या प्रकरणी संबधित विभागाच्या वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे त्या अंगणवाडी सेविकेला बडतर्फ करा अशी मागणी जोर धरत आहे.या प्रकरणी चौकशी समितीस निवेदन देताना चिखली (ई) येथील सरपंच विठ्ठल सिंगरवाड,सुरेश झरिवाड,गंगाधर झरिवाड,पवन नागुवाड. ग्रा.प.सदस्य अजय वाघमारे यांच्यासह गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी