पिंपळगाव (म) येथे ट्रकने दुचाकीला उडविले :१जण जागीच ठार,१जखमी -NNL

एकेरी रस्त्याचा हा तिसरा बळी


अर्धापूर, निळकंठ मदने|
नांदेड-अर्धापूर महामार्गावरील पिंपळगाव (म) पाटी येथील मुख्य रस्त्यावर एका ट्रकने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना उडविल्याने १ दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून,१ जण जखमी झाला आहे,जखमींवर नांदेड च्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.एकेरी रस्त्यामुळे हा अपघात झाला असून,हा तिसरा बळी आहे.

नांदेड-अर्धापूर राज्य क्र.३६१ या महामार्गावर आसनापुलाजवळील अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव (म) पाटीजवळ बुधवारी दुपारी ३:३० वा.एका ट्रकने (ट्रक क्र.एम एच २६-एडी ०७१९) समोरुन येणारे एका दुचाकीवरून दोन जण प्रवास करीत असतांना धडक झाली. यामध्ये सचीन संभाजी पलेवाड वय (२३) यांचा जागीच मृत्यू झाला. ते भोकर येथे औषधी दुकानात काम करायचा, त्यांच्या पश्चात आई, वडील,१भाऊ,१बहिण असा परीवार आहे.

शिवराज बालाजी वाधे (२८) रा.तुराटी ता.उमरी यांच्या डाव्या पायाला फॅक्चर आहे.या दोघांना अर्धापूर हुन नांदेडकडे सापाने चावा घेतलेल्या सोनाजी दाचेवाड वय(४०) यांना पुढील उपचारासाठी घेऊन  जाणाऱ्या १०८ गाडीतून आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद शिंदे यांनी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. गेल्या चार महिन्यांपासून येथे एकेरी रस्त्यावरुनच वाहतूक आहे, एकेरी रस्त्यावरील हा तिसरा बळी ठरला आहे,तरी के टी कंपनीचे अधिकारी झोपेतून कधीं जागी होतील. हा प्रश्न प्रवाशांसह चालकांना पडला आहे.यावेळी पोलिस निरीक्षक अशोक जाधव, महामार्गाचे पोलीसांनी वाहतूक सुरळीत केली.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी