आ. संतोष बांगर यांच्या प्रयत्नांमुळे हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एकूण २८९ कोटी १८ लक्ष ९६ हजार रुपये नुकसान भरपाई मंजूर -NNL


हिंगोली|
हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर साहेब यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले असून, हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या आणखी १ लाख ३४ हजार ४६६ शेतकऱ्यांना तब्बल १३२ कोटी १४ लक्ष ९६ हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. अतिवृष्टीने नुकसान झालेला एकही शेतकरी नुकसान भरपाई मिळाल्या वाचून राहणार नाही. 

हिंगोली जिल्ह्यासाठी आधी १ लाख १८ हजार ७४८ हेक्टर क्षेत्रावरील एक लाख २५ हजार ५७५  अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी १५७ कोटी ४ लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली होती. नंतर आमदार संतोष बांगर यांनी सर्व तालुका प्रशासनाकडून अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून शासनाकडे पाठपुरावा करून नव्याने हिंगोली जिल्ह्यातील ९६ हजार ४७७  हेक्टर क्षेत्रावरील १ लाख ३४ हजार ४०६ शेतकऱ्यांना १३२ कोटी १४ लक्ष ९६ हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळवून दिली.

आता हिंगोली जिल्ह्यातील २ लाख ८ हजार ४२५ हेक्टर क्षेत्रावरील एकूण २ लाख ५९ हजार ९८१  अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांसाठी तब्बल २८९ कोटी १८ लक्ष ९६ हजार रुपयांची नुकसान भरपाई आमदार संतोष बांगर यांनी शासनाकडे केलेल्या पाठ पुराव्याने मंजूर झाली. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी आमदार संतोष बांगर यांचे मनापासून आभार मानले असून, हे मंडळ अतिवृष्टी नुकसान भरपाई यादीतून वगळले ते मंडळ वगळले अशा अफवा सोशल मीडिया वरून पसरवणाऱ्या व सवंग प्रसिद्धीसाठी शेतकऱ्यांना घेऊन त्यांची दिशाभूल करून आंदोलन करणाऱ्या तथाकथित शेतकरी नेत्यांना व ढोंगी पुढाऱ्यांना आमदार संतोष बांगर यांनी आपल्या कार्यातून सणसणीत चपराक लगावल्याची भावना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावेळी बोलून दाखवली जात आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी