स्व.आ.गोविंदराव राठोड स्मृती वक्तृत्व स्पर्धेत सुल्लाळी - डोंगरगाव आश्रम शाळेची सना शेख प्रथम -NNL


मुखेड, रणजित जामखेडकर|
मुखेड येथून जवळच असलेल्या वसंतनगर येथील सेवादास माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने स्वर्गीय आमदार गोविंदराव राठोड यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त संस्था अंतर्गत आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. 

या स्पर्धेसाठी लोकनेते स्व‌.आमदार गोविंदराव राठोड व्यक्ती,कार्य आणि आई हा विषय ठेवण्यात आला होता. या स्पर्धेत सुल्लाळी - डोंगरगाव तालुका जळकोट येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेची विद्यार्थिनी सना शेख हिने प्रथम क्रमांक मिळविला आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून या स्पर्धेसाठी सना शेख या विद्यार्थिनीला सहशिक्षक चंद्रशेखर गव्हाणे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते.

विमुक्त जाती सेवा समिती या शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष किशनराव राठोड, सचिव गंगाधरराव राठोड, लोकप्रिय आ. डॉ. तुषार राठोड, जिल्हा परिषद सदस्य संतोषभाऊ राठोड, शाळेचे प्राचार्य नागनाथ कोयलकोंडे, व्यंकट रामदिनवार, संजय राठोड, सय्यद जलील आदींनी अभिनंदन केले आहे.

संस्थेच्या विश्वस्त श्रीमती चक्रवतीबाई गोविंदराव राठोड यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरित करण्यात आले. यावेळी संस्थेचे सहसचिव गोवर्धनजी पवार, प्राचार्य डॉ. हरिदास राठोड, प्राचार्य मेघाजी सर, प्राचार्य दिलीप गायकवाड मुख्याध्यापक गोविंदराव पवार, मुख्याध्यापक संदीप गेटकेवार आदींची उपस्थिती होती.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी