भाऊराव चव्हाण कारखान्याची निवडणूक बिनविरोध; अमिता चव्हाण,प्रवीण देशमुखांची निवडणूकीतून माघार -NNL

जुन्या सहा संचालकांना डच्चू : नरेंद्र चव्हाण यांची एन्ट्री


अर्धापूर, निळकंठ मदने|
भाऊराव चव्हाण कारखान्याचे मुख्य प्रवर्तक माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण असल्याने भाऊरावची  निवडणूक बहुचर्चित ठरली. त्यातच भर निवडणूक प्रक्रिया सुरू होऊन अचानक निवडणूक लांबली, त्यामुळे विरोधकांना वेळ मिळाला. तरी अशोकराव चव्हाण यांनी राजकीय मुत्सद्दीपणा दाखवित शांतपणे जादूऊ कांडी फिरवत सहा संचालकांना धक्के देत नव्या संचालकांना संधी दिली, राज्यातील सतांतरामुळे शुक्रवारी भाऊरावची निवडणूक लक्षवेधी ठरणार असल्याची जिल्ह्यात चर्चा असतांना ही निवडणूक बिनविरोध होऊन २१ संचालक बिनविरोध निवडून आले.

अर्धापूर तालुक्यातील भाऊराव चव्हाण कारखान्याची उभारणी तत्कालीन केंद्रीय मंत्री डॉ शंकरराव चव्हाण यांनी केली. या कारखान्याचे मुख्य प्रवर्तक माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे असून, संचालक मंडळात अमिता चव्हाण ह्या असल्याने व अशोकराव चव्हाण यांचे संपूर्ण लक्ष या कारखान्यावर असते. कारखाना स्थापन झाल्यापासून येथे अशोकराव चव्हाण यांच्या पॅनलची एकतर्फी सता राहिली आहे. भोकर विधानसभा मतदार संघात हा कारखाना अत्यंत महत्वाचा आहे. दरवर्षी विक्रमी गाळप येथे होत असल्याने परीसरातील सभासदांना अच्छे दिन आले आहेत. राजकीय विरोधकांनी येथे अनेक वेळा निवडणूका लावल्या,तर २००५ -२००६ ला बिनविरोध निवडणूक झाली होती. सध्या राज्यात राजकीय भुकंप होऊन सतांतर घडवून आले.

त्यामुळे भाऊराव ची निवडणूक लक्षवेधी ठरणार असल्याची चर्चा जिल्हात होती,अशोकराव चव्हाण यांचे व्यस्त  कार्यक्रमातूनही भाऊरावच्या निवडणूकीवर सुक्ष्म लक्ष होते. निवडणूकीची प्रक्रिया जैसे थे थांबली,पण सहकार क्षेत्रातील कारखान्याच्या निवडणुकी घेण्याचे राज्य सरकारने सांगितले,त्या धर्तीवर भाऊरावची निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. २१ आॅक्टोंबरला शुक्रवारी उमेदवारी परत घेण्याच्या दिवशी अनेक उमेदवारांना धक्का देत अशोकराव चव्हाण यांच्या आदेशाचे पालन करुन माजी आमदार अमीताभाभी चव्हाण, अर्धापूर शहरातील सर्वमान्य प्रवीण देशमुख या विद्यमान संचालकासह रोहीदास दतराव बंडाळे,विजय शिंदे,उमाजी भद्रे यांनी शुक्रवारी उमेदवारी परत घेतली.

तर शारदा भवन संस्थेचे संचालक नरेंद्र चव्हाण यांना माजी आमदार अमीताभाभी चव्हाण यांच्या जागी,तर जेष्ठ संचालक रंगराव इंगोले यांच्या जागी त्यांचे मित्यभाषी चिरंजीव बळवंत इंगोले,तर प्रवीण देशमुख यांच्या जागी माजी समाजकल्याण सभापती व्यंकटराव साखरे, भिमराव कल्याणे  यांच्या जागी माधवराव कल्याणे यांना संधी दिली, नरेंद्र चव्हाण यांची भाऊरावच्या संचालक मंडळावर एंट्री झाली आहे,या कारखान्याचे दोन‌वेळा विद्यमान चेअरमन गणपतराव तिडके हे राहिले आहेत, ऐनवेळी अनेकांना धक्का देत ६ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे,या कारखान्याची बिनविरोध निवडणूक होण्याची ही दुसरी वेळ आहे.

यावेळी लक्ष्मीनगर गटातून गणपतराव तिडके, अँड सुभाषराव कल्याणकर, व्यंकटराव साखरे.बारड गटातून प्रा.कैलास दाड, व्यंकटराव कल्याणकर,शिवाजीराव नरबाजी पवार, मालेगाव गटातून बळवंतराव रंगराव इंगोले, मोतीराम जगताप,लालजी कदम, मुदखेड गटातून बालाजी गोविंदराव शिंदे,माधव व्यंकटराव शिंदे,किशन दशरथ पाटील,आमदुरा गटातून दतराम अवातिरक, अशोक कदम, माधवराव कल्याणे, उत्पादक सहकारी संस्था मतदार संघातून नरेंद्र चव्हाण, अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती आनंदराव सावते, महिला प्रतिनिधी कमलबाई दतराम सुर्यवंशी,मीरा शामराव पाटील कोल्हेकर,इतर मागासवर्गीय गटातून सुभाषराव देशमुख पाटणूरकर, भटक्या विमुक्त जामाती विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून साहेबराव लच्छमाजी राठोड या २१ संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे.

निवडणूक‍ निर्णय अधिकारी लतीफ पठाण तर सहाय्यक मुगाजी काकडे,एम डी मुळे,पी वाय सपकाळ, माधव बोखारे, यांनी काम पाहिले, यावेळी आ.अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, बी आर कदम, सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे, पप्पू पाटील कोंढेकर, शहराध्यक्ष राजेश्वर शेटे,नासेरखान पठाण,व्यंकटराव कल्याणकर,पपू बेग,छत्रपती कानोडे,निळकंठ मदने, ज्ञानेश्वर राजेगोरे यांच्यासह आदिंची ऊस उत्पादक,कर्मचारी, यांसह अनेकांचे चेअरमन व व्हाईस चेअरमनपदी कोणाची निवड होणार याकडे लक्ष‌ वेधले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी