जगाचा पोशिंदा शेतकरी अद्यापही सरकारच्या मदतीच्या प्रतिक्षेत - ऍड.गजानन देवकत्ते -NNL

तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा, दुष्काळी अनुदान, चालू कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम तात्काळ अदा करा 


मुखेड, रणजित जामखेडकर|
यंदाच्या खरीप हंगामात शेती मशागती नंतर पेरणी झाली व रोज धो-धो पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.नुकसानीचे भिषण वास्तव काळीज हेलावणार असुन, या परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज होती. माञ मदत राहीली दुर नेते व अधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिक नुकसानीला पाहीजे तशी मदत जाहीर झाली नाही. त्यामुळे नेते व अधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्याचे सोपस्कार आणि फोटोसेशन, नौटंकी , श्रेयवादाचे सोहळे संपली असतील तर तातडीने मदत करा. असा टाहो शेतकरी फोडत आहे. 

देशासह जगाला पोसण्याचा ठेका घेतलेला शेतकरी आज सततच्या नैसर्गिक संकटामुळे हतबल झाला आहे.मागील वर्षी हाता तोंडाशी आलेले पिक पाहिजे तसे पाण्या अभावी  आले नाही.या वर्षी तर पेरणी पासुनच संकटाची मालीका सुरु आहे. सोयाबीन,मुग,उडीद व ज्वारी पेरले नुकतेच उगवलेले कोवळे पिक जळाले अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार आणि तिबार  पेरणी करावी लागली. यातुन जे काही पिक आले पंचमी ते पोळा असा तब्बल महिनाभर पाऊस पेक्षा जास्त पावसाच्या सरीचा सामना करावा लागला.

विजेचा लपंडाव वरुणराजाची अवकृप्पा यातून कसेबसे उगवलेल्या सोयाबीन, मुग, उडीद, ज्वारी वर अनेक रोगांनी थयमान घातल. या साऱ्या संकटाच्या मालिकेतून उरलेले सोयाबीन, तुर ,मुग , उडीद, यासह पिकांना दसरा दरम्यान अतिवृष्टीचा मोठा सामना करावा लागला . सलग सुरु राहिलेल्या पावसामुळे शेतीत अजुनही पाजर कायम चालु आहे.कुठे काढणीला आलेले पिक तर कुठे काढणी झालेले पिक पाण्यावर तरंगत होते.  नेते माञ एकमेकावर आरोप प्रतिआरोप करीत अधिकारी पाहणी करण्यासाठी येत आहे, पंचनामा होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

परंतु कशातच काही नाही , पाहणी दौरे फोटोसेशनमध्ये शेतकऱ्यांची शेती झीजली. राहिल्या पिकाची राकरांगोळी होऊन मोडकी वापली पण अद्याप ना बांदावरचा पंचनामा झाला. ना नाही मदत मिळाली  विमाकंपणीचे सर्वर डाऊन आहे. अर्गीम देण्यास तयार नाही .या परिस्थितीत सारे फोटोसेशन सोहळे संपले असतील व तुमच्या पाहणी दौऱ्याच्या खर्चाचा कोठा पुर्ण झाला असेल व तो खर्च शेतकऱ्यांनवर टाकावयाचा नसेल व तुमच्या आँनलाईन प्रक्रिया शेतकऱ्यांना परवडत नाहीत तर सरसकट मदत जाहिर करावी अशी मागणी शेतकरी पुत्र तालुक्यातील युवा विधीतज्ज्ञ अँड गजानन देवकत्ते यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलतांना व्यक्त केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी