हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात महावितरण अधिकाऱ्यांनी खेळखंडोबा चालविला- NNL

अधिकाऱ्यांचा मनमानी कारभारामुळे वीज गळतीचे प्रमाण वाढू लागले  


हिमायतनगर, अनिल मादसवार|
शहर व ग्रामीण भागात महावितरण अधिकाऱ्यांनी खेळखंडोबा चालविला आहे. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या वीजपुरवठयात नेहमीच व्यत्यय निर्माण होत असून, आता तर अधिकारी कार्यालयात हजर राहत नसल्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या शेतकरी व सर्व सामान्य नागरिकांना समस्या सोडविण्यासाठी चपला झिजवाव्या लागत आहेत. तर प्रामाणिक बिल भरणाऱ्या ग्राहकांना विजेच्या लपंडावाचा त्रास सहन करावा असून, दिवाळीच्या काळात नागरिकांच्या समस्येवर तोडगा न काढल्यास वीज बिल न भरण्याचा पवित्रा ग्राहक घेण्याच्या तयारीत आहेत.


शहर व ग्रामीण भागात महावितरण अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरु असल्याने वीज गळतीचे प्रमाण वाढत आहे. त्यात प्रचंड वर्दळ असलेल्या शहरी भागातही ५ ते १० टक्के वीज गळती होते आहे. ग्रामीण भागात कृषी कनेक्शनच्या नावाखाली अनेक प्रकार सुरू आहेत. सध्या दिवाळीचा पर्वकाळ सुरु आहे, आणि वादळी वारे व पावसाचा जोरही होती आहे. अश्या परिस्थितीत महावितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी कर्तव्याच्या ठिकाणावर राहून सेवा देणे क्रमप्राप्त आहे. मात्र अधिकारी स्वार्थ असलेल्या कामावर जास्त लक्ष देत असून, सेवा देणाऱ्या कामाकडे मात्र जानीवीपुर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसते आहे. गेल्या ४ दिवसापासून अनेक जण आपल्या विविध समया घेऊन कार्यालयात येत आहेत. मात्र येथील शहर व ग्रामीण अभियंता एव्हडेच नाहीतर उपकार्यकारी अभियंता देखील कार्यालयात हजर राहत नसल्याने नागरिकांना आल्या पाऊलाने परत जावे लागत आहे. 

तेवढी ताकद स्वार्थी कामे पूर्ण करण्याकडे लावली तेवढी ताकद जर वीज चोरी करणाऱ्यांवर लावून कारवाई केली असती तर प्रामाणिक वीज बिल भऱत असलेल्या ग्राहकांवर अतिरिक्त वीजवापराचा बोजा पडला नसता. महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अजब कारभारामुळे आकडेबहाद्दर मोकाट, तर अधिकृत ग्राहक असलेल्यांवर कारवाईची टांगती तलवार कायम असल्याचे अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराच्या प्रकारावरून दिसते आहे. महावितरण कामापनीकडून मोठ्या प्रमाणात मानधन घेत असताना वीज गळती, चोरीवर प्रामाणीकपणे लक्ष केंद्रित करून ते थोपवणे व ग्राहकांना योग्य दरात वीजपुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण करणे अनिवार्य आहे. तालुक्यांत अनेकांनी आकडे टाकून अथवा अधिकाऱ्यांना हाताशी धरून अनधिकृत रित्या विजेचा वापर सुरू असून, अनेकांनी ८-१० वर्षे अशीच काढली आहेत. 

अधिकारी-कर्मचारी यांना याची माहिती असतानाही त्या संबंधितांवर कारवाई अथवा दंडही होताना दिसत नाही. त्यांच्या डोळ्यांसमोर चोरी, तरीही अभियंते चिडीचूप... ही भूमिका संशय वाढवणारी आहे. मागील वर्षी असाच प्रकार हिमायतनगर येथील रेल्वे वसाहत बांधकामाच्या ठिकाणी घडला होता. ज्या अभियंत्याच्या अखत्यारीत हे शहर आहे, त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी झाली होती. या संदर्भाच्या तक्रारी ऊर्जा मंत्र्यांपर्यंत गेल्या होत्या. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभियंत्याच्या या प्रकाराला खतपाणी दिल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या मनमानी कारभार आजही सुरुच आहे. अशा कर्मचारी-अधिकाऱ्यांवर कारवाईचा नियम फक्त कागदावरच ठेवले जात असल्यामुळे शहर व ग्रामीण भागात वीजगळतील एक प्रकारे अभय मिळते आहे. 

काही ठिकाणी शहरे भागात आणि मुख्यतः ग्रामीण भागात आकडा टाकून वीज चोरी केली जाते. ग्रामीण भागातील अनेकजण महावितरणच्या खुल्या तारांवर आकडे म्हणजेच हूक टाकून वीज चोरी करतात. हे अत्यंत धोकादायक आहे. यामध्ये शॉक लागून मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे. शहर व तालुक्यातील काही भागांत मीटरमध्ये छेडछाड करून मीटरमध्ये इलेक्ट्रॉनिक चीप बसवून त्याला रिमोट कंट्रोलवर केले जाते. ज्यामुळे रिमोटद्वारे त्याचे रीडिंग बंद चालू केले जाते. एव्हडेच नाहीतर मीटर बायपासद्वारेदेखील वीज चोरी केली जाते ही बाब गंभीर आहे. मात्र याकडे देखील हिमायतनगर येथील अभियंत्याचे दुर्लक्ष होत असल्याने मोठ्या प्रमाणात शासनाला फटका बसत आहे. त्यात भर म्हणून  थकबाकीदारही मोठ्या प्रमाणात आहेत. 

एकट्या नगरपंचायतीकडे कोट्यवधींची थकबाकी असताना देखील हि वसुली करण्याकडे अभियंते दुर्लक्ष करत असल्याने शासनाला मोठा आर्थिक फटका बसता आहे. या प्रकाराकडे नांदेडच्या मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता यांनी लक्ष देऊन हिमायतनगर शहर व तालुका परिसरात अधिकारी - कर्मचाऱ्याकडून चालविल्या जाणाऱ्या आलबेल प्रकाराला चाप लावून प्रामाणिक वीजदेयके भरणार्यांना सुरळीत सेवा द्यावी आणि इतरांच्या वीज चोरीचा बोजा बसणार नाही याची दक्षता घेण्यासाठी हिमायतनगर येथे अनेक दिवसापासून ठाण मांडून बसलेल्या अभियंत्यांची उचलबांगडी करावी अशी मागणी प्रामाणिक वीजग्राहकातून केली जात आहे.

कार्यालय सुरु अधिकाऱ्यांच्या खुर्च्या मात्र रिकाम्या

हिमायतनगर येथे आसलेल्या महावितरण कार्यालयात उपकार्यकारी अभियंत्यासह शहरी आणि ग्रामीण अभियंत्याचे कक्ष आहे. सदरील कक्षाला कधी कुलूप तर कधी उघडे असते. मात्र संबंधित अधिकारी खुर्चीवर नसतात. त्यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागते आहे. सध्या दिवाळीचा पर्वकाळ सुरु असल्याने अधिकारी कार्यालयात अनुपस्थित राहून मागल्या काळातील केलेल्या कारभारावर एक प्रकारे पडदा टाकण्याचे काम करत असल्यामुळे कार्यालयाबाहेर जास्त वेळ थांबत असल्याचे येथे आलेल्या अनेक नागरिकांनि पत्रकारांशी बोलून दाखविले आहे. याबाबत अभियंत्याशी संपर्क केला असता त्यांनी फोन न उचलता पत्रकारांशी एक प्रकारे बातचीत करणे टाळले असल्याने कार्यालयातील कारभाराबात साशंकता निर्माण झाली आहे.     

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी