हिमायतनगर शहरात आमदार जवळगावकर यांचे पळशीकर बंधू कडून जंगी स्वागत -NNL

पेढा भरवीत दिल्या दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

पळशीकर यांच्या स्वस्त धान्य दुकानात आनंदाच्या शिधा वितरणाचा शुभारंभ


हिमायतनगर, अनिल मादसवार।
हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी आज पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हिमायतनगर येथे भेट देऊन शहरातील व्यापारी बांधवांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच येथील श्री पळशीकर बंधू यांच्या स्वस्त धान्य दुकानातून गोरगरिब लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा किटचे वितरण करून शुभारंभ केला.


हिमायतनगर शहरात आल्यानंतर प्रथमता आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वराचे मनोभावे दर्शन घेऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना यातून सावरण्याची शक्ती मिळो. सर्वांना यंदाची दिवाळी आनंदाने व धन धान्याने संपन्न करणारी आणि आरोग्यदायी ठरो अशी कामना श्री चरणी नतमस्तक होऊन केली. यावेळी श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने शांतीलाल श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते शाल पुष्पहाराणे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शहरातील व्यापारी बांधवांना शुभेच्छा देत आमदार जवळगावकर येथील प्रसिद्ध व्यापारी श्री पळशीकर यांच्या स्वस्त धान्य दुकानात पोचले. 


या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आनंदाचा शिधा या उपक्रमातील दिवाळी किट लाभार्थ्यांना देऊन शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी सुरेश आप्पा पळशीकर, संदीप आप्पा पळशीकर, संतोष आप्पा पळशीकर, सभापती डॉ प्रकाश वानखेडे, फेरोज खान पठाण, गणेशराव शिंदे, समद खान पठाण, संजय माने, जनार्दन ताडेवाड, अखिल सेठ, अनंतराव देवकते, अब्दुल खालिद मतीन भाई, पंडित ढोणे आदींसह मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी व गुडघ्याला बाशिंग बांधून आगामी नगरपंचायत निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले कार्यकर्ते देखील आमदार जवळगावकर यांच्या पाठीमागे आले होते.


आनंदाचा शिधा उपक्रमाचा शुभारंभ झाल्यानंतर तीनही पळशीकर भावंडांनी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचा शाल श्रीफळ पुष्पहार व मिठाईचा बॉक्स देऊन स्वागत सत्कार केला. तसेच आनंदाने पेढा भरवीत दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार जवळगावकर यांनी नांदेड न्यूज लाईव्ह बोलताना हदगाव हिमायतनगर मतदार संघातील व्यापारी, शेतकरी, नागरिक, पत्रकार, सर्व जनतेला आणि आनंदाचा शिधा मिळालेल्या सर्व लाभार्थ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी उपस्थित झालेल्या आमदार जवळगावकरांसोबत उपस्थित झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना फराळ देण्यात आला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी