प्रभारी केंद्रप्रमुखाच्या विरोधात महिला मुख्याध्यापिकेचे उपोषण -NNL

मानसिक त्रास देऊन वरिष्ठांकडे खोट्या तक्रारी केल्याचा आरोप 


मुखेड, नामदेव यलकटवार।
मुखेड येथील शिक्षण विभागात मागील अनेक दिवसांपासून अनागोंदी कारभाराने चांगलाच कळस मांडलेला असताना आता महिला मुख्याध्यापिकेला मानसिक त्रास देऊन अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या प्रभारी केंद्रप्रमुख शिवाजी कराळे यांच्या विरोधात पंचायत समिती, मुखेडच्या समोर दि.३१ रोजी साखळी उपोषण होत असल्याने महिला मुख्याधापिकेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी की, शिवाजी कराळे यांनी प्रभारी केंद्रप्रमुखपदाचा पदभार मिळताच सहशिक्षक, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यावर मनमानी करून त्यांना वरिष्ठांना चुकीची व दिशाभूल करणारी माहिती वा अहवाल देऊन मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न मागील अनेक दिवसांपासून चालवला आहे. त्याच बरोबर शाळेला एक दिवसाआड अचानक भेट देणे,शाळा भेट रजिस्टरला नोंद न करणे,निलंबित करण्याची धमकी देणे,कुठल्या न कुठल्या गैर व्यवहारात तुमचे नाव समाविष्ट करेन,शिक्षक उपस्थिती पटावर खाडाखोड करणे,द्वीभाषिक मध्ये अर्वाच्य शिवीगाळ करणे,कारणे दाखवा नोटीस देणे,मानसिक खच्चीकरण करणे, इतरत्र लोकांना तक्रारी करायला लागणे,

यासह अन्य प्रकार शिवाजी कराळे त्यांने चालवल्याने श्रीमती मधुमालती चंद्रकांतराव जोशी यांनी दि.१६/०९/२०२२ रोजी शिक्षण उपसंचालक, मुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्रा),पोलीस अधीक्षक नांदेड,गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली.त्या तक्रारीची दखल न घेतल्याने दि.३१ रोजी साखळी उपोषण करत आहेत.

जि.प.कें.प्रा.शा.ब्रँच मुखेड अंतर्गत जि.प.प्रा.शा.देवला तांडा (मंग्याळ) येथे कार्यरत असलेले महिला मुख्याध्यापिका श्रीमती मधुमालती चंद्रकांतराव जोशी ह्या कार्यरत आहेत.ते विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शालेय विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास यासह विविध शैक्षणिक उपक्रम राबवून शाळेची गुणवत्ता व विद्यार्थी संख्या कायम ठेवली आहे. प्रभारी केंद्रप्रमुख म्हणून शिवाजी कराळे यांनी केंद्रप्रमुखपदाचा पदभार त्यांच्याकडे देण्यात आला मात्र कराळे यांच्याकडे केंद्रप्रमुख पदासाठी पात्र असलेल्या शैक्षणिक किंवा इतर पात्रता नसताना केंद्रामध्ये ११ पदवीधर शिक्षक, २ अपग्रेड मुख्याध्यापक तसेच त्यांच्या पेक्षा सेवाज्येष्ठ असे ४० शिक्षक असताना सुद्धा चुकीच्या पद्धतीने तत्कालीन प्रभारी गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांच्याशी आर्थिक तडजोडीवर राजकीय दबावाचा वापर करत केंद्रप्रमुख पद मिळवले.तसेच खोट्या माहितीच्या आधारे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळवला आहे.शिवाजी कराळे हे जि.प.कें.प्रा.शा.ब्रँच मुखेड या शाळेमध्ये दि.०१/०३/२०१३ रोजी नियुक्त झाले असून ते आज २०२२ पर्यंत इथेच कार्यरत आहेत.

सन २०१८ मध्ये झालेल्या बदली प्रक्रियेत दि.१५/०६/२०१८  रोजी चुकीची बदली झाली या कारणास्तव शासनास वेठीस धरून दि.१८/02/२०१९ रोजी या शाळेमध्ये परत आले आहेत.परंतु त्यांची सलग तीन वर्षे सेवकाल बाहेर झालेला नाही.त्यामुळे या केंद्रातील सेवा जेष्ठता दि.०१/०३/२०१३ पासुन ग्राह्य धरून उपरोक्त शिक्षक बदलीस पात्र आहेत.असे असतानाही शिक्षक बदली पोर्टलला बदलीस पात्र नसल्याचे दाखवत आहेत.

शिवाजी कराळे यांनी सन २०१८-१९ मध्ये शिवाजी विधी महाविद्यालय कंधार येथे नियमित या कालावधीत कॉलेज केल्याचे आढळून येते तर त्याच कालावधीत जिल्हा परिषद केंद्रीय ब्रँच शाळा मुखेड येथे पगार उचलून अपहार केल्याचे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.त्यामुळे महिला मुख्याध्यापिकेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी