कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या प्रकाश दूतांचे पणत्या लावून स्मरण -NNL

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार। संघाकडून आदरांजली


पुणे।
कोरोना काळात कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या ७० प्रकाश दूतांना महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीनं ७० दीप लावून आदरांजली वाहण्यात आली सगळीकडे दिव्यांचा उत्सव सुरु असताना या ७० प्रकाश दूतांचे कुटंबीय मात्र उपेक्षित आहेत त्यांना न्याय  मिळावा अशी मागणी यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आली.


कोरोना काळात राज्यातील सर्व अत्यावश्यक सेवा सर्व वृत्तांचे कव्हरेज करणारे  TV मीडिया / वृत्तपत्र कार्यालये हॉस्पिटल, मेडिकल, लॅबोरेटरीज मेडिकल, सर्व अत्यावश्यक , कारखाने, औषधी सेवांची दुकाने,शासन व पोलीस यंत्रणा विविध अत्यावश्यक उद्योग आणि सर्व नागरिकांना वीज आवश्यक होती. कोरोना काळामध्ये २४×७ अखंडित वीजपुरवठा करण्यात मोलाचा वाटा असलेले महावितरण महापारेषण महानिर्मिती कंपनीतील अनेक अधिकारी,  कायम कामगार, तसेच तिन्ही कंपनीतील नियमित रिक्त पदाच्या जागेवर कार्यरत असलेले सुमारे 70 कंत्राटी कामगार हे कोरोना काळामध्ये कर्तव्यावर जनतेला वीज सेवा देताना शहीद झाले.


पुणे महावितरण प्रादेशिक संचालक विभाग प्रकाश भवन समोर ७० दीप यावेळी प्रजवळीत करण्यात आले. या ७० शहीद वीज कंत्राटी कामगारांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोणताही निधी देण्यात आला नाही. दिवाळीच्या पूर्व संध्येला अशा सर्व शहीद प्रकाशदूतांचे स्मरण ७० दीप लावून महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघाने) केले  आहे. 

या कामगारांच्या कुटुंबियांना अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही.  तरी कंत्राटी कामगारांच्या कुटुंबियांना ऊर्जामंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी शासनाच्या वतीने आर्थिक मदत करावी व समस्यां जाणून घेण्यासाठी संघटने सोबत एक बैठक आयोजित करण्यात यावी  अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष श्री नीलेश खरात यांनी केली आहे.  

या वेळी संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, उपमहामंत्री राहूल बोडके, कार्याध्यक्ष उमेश आणेराव, कोषाध्यक्ष सागर पवार, भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण  पुणे झोन अध्यक्ष सुमित कांबळे,व सचिव निखिल टेकवडे व तुकाराम वाल्हेकर इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी