२० दिवसानंतर ही 'त्या' अंगणवाडी सेविकेवर कारवाई नाही; महिला व बालविकास प्रकल्प कार्यालय मूग गिळून गप्प -NNL

वरिष्ठ अधिकारी कारवाई का..? करत नाहीत 'त्या' राजकीय व्यक्तीच्या दबावासमोर संबधित प्रशासन झुकत आहे की काय ? नेमके काय गौडबंगाल गावकऱ्यांसमोर प्रश्न                            


शिवणी, प्रकाश कार्लेवाड।
मौजे चिखली (ई) येथील अंगणवाडी सेविकेने दि.१० ऑक्टोबर रोजी पोषण आहार अफरातफरी करत असतांना गावकऱ्यांनी अंगणवाडी सेविकेचा पाठलाग करत शिवणी येथे आंगणवाडीचा पोषण आहारासह टेम्पो पकडण्यात आले होते.या संबंधी संबंधित विभागाने तात्काळ चौकशीचे आदेश दिले होते.चौकशी होऊन ही वीस दिवस झाले तरी ही, पोषण आहार अफरातफरी करत असतांना रंगेहात पकडून सुद्धा संबधित अंगणवाडी सेविकेवर कारवाई का नाही ?.तर यात संबंधित विभागाच्या काही वरिष्ठ अधिकारी आहेत की काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे.तर दुसरीकडे या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत आहे की काय, अद्याप कारवाई न करण्याचे गौडबंगाल काय ? असा सवाल गावकऱ्यांसह परिसरात उलट सुलट चर्चा  होत आहे.            

किनवट तालुक्यातील मौजे चिखली (ई) येथील अंगणवाडी सेविकेने पोषण आहाराचा अफरातफरी करत असतांना शिवणी येथील बसस्थानक चौकात गावकऱ्यांनी दि.१० ऑक्टोबर रोजी संबंधित अंगणवाडी सेविकेस पोषण आहारासह रंगेहात पकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आले होते.या प्रकरणी महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी तात्काळ चौकशीचे ही आदेश दिले होते.या अनुषंगाने दि .१३ ऑक्टोबर रोजी चौकशी ही करण्यात आली होती.या प्रकरणास २० दिवस उलटून गेले तरी पण संबधित विभागाकडून अंगणवाडी सेविकेवर कोणत्याच प्रकारचे कारवाई करण्यात का आली नाही.तर चौकशी दरम्यान संबंधित अंगणवाडी सेविकेने आपल्या  हाताखाली काम करणाऱ्या मदतनिसेस जीवे मारण्याची ही धमकी दिली आहे.या प्रकरणी इस्लापुर पोलीस स्टेशन येथे भा.द.वि ५०४, ५०६,प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे चिखली (ई) येथील सरपंच सह सर्व गावकरी मंडळींनी संबधित विभागाच्या चौकशी समितीस त्या अंगणवाडी सेविकेस बडतर्फ करा अन्यथा नांदेड जिल्हा परिषद समोर उपोषणास बसण्याचा लेखी निवेदनाद्वारे इशारा महिला व बालविकास प्रकल्प किनवट कार्यालयास दिले आहे.या प्रकरणी संबधित विभागाचे वरिष्ट अधिकारी यांनी आंगणवाडीचा पोषण आहार अफरातफरी करत असतांना रंगेहात पकडून  दिवस झाले तरी सुद्ध कारवाई का नाही? असा प्रश्न निर्माण होत असून या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी कोणाच्या तरी दबावापुढे झुकत आहेत की काय ?  नेमके काय गौडबंगाल ? असा प्रश्न गावकऱ्यांसमोर असून त्या अंगणवाडी सेविकेस तात्काळ बडतर्फ करा अन्यथा गावकऱ्यांनी उपोषणाचा बडगा वापरणार असा इशारा दिलेला आहे.

लवकरच नांदेड जिल्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वर्षा ठाकूर-घुगे यांना चिखली (ई) येथील गावकरी या प्रकरणी भेट घेण्यासाठी जाणार असल्याचे कळते. संबधित प्रकरणी महिला व बालविकास प्रकल्प किनवट कार्यालयाद्वारे काय कारवाई करेल या कडे शिवणी इस्लापुर परिसरातील जनतेचे लक्ष्य लागले आहे. तर या कारवाईस उशीर होत असल्याने संबंधित विभागाच्या अधिकारीही यात  सामील आहेत की काय असे उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.                                              

महिला व बाल विकास प्रकल्प विभागाने चिखली (ई) गावकऱ्यांचे अंत पाहू नये लवकरच उपोषसनास बसणार - सरपंच सिंगरवाड      


भ्रष्टाचार आज दुर्दैवाने शिष्टाचार झाला असून वरीष्ठ अधिकारी प्रत्येक गोष्टीत कमिशन' व डोळेझाक शोधण्याची मानसिकता शासकीय व्यवस्थेत वाढली आहे. त्यातून कुणीही सुटत नसल्याचे चित्र असून यात चिमुकल्यांचा पोषण आहारही सुटलेला नाही. ग्रामीण भागातील बालकांना अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार दिला जातो.

त्यामुळे कुपोषण नियंत्रणात आणण्यास शासनाला यापैकी यश आले किंवा नाही. हे सांगणे कठीण आहे.अंगणवाडी एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत अंगणवाड्या सुरू केल्या. मात्र भ्रष्टाचाराने संपूर्ण यंत्रणाच पोखरल्याचे चित्र दिसून येत आहे.याचे कारण जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत किनवट तालुक्यात अंगणवाड्या कार्यरत असून, येथे चिमुकल्यांचा पोषण आहार अंगणवाडी सेविकेकडून भर दिवसा अफरातफरी करत असतांना संबधित अंगणवाडी सेविकेला  किनवट तालुक्यातील शिवणी येथील बसस्टॉप वर रंगेहात पकडून २० दिवस उलटून गेल्याने  हा प्रश्न चव्हाट्यावर आला. 

अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना सुदृढ आहार मिळणे क्रमप्राप्त चिमुकल्यांना वितरित करण्यात आला. यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही चिखली (ई) गावकऱ्यांनी केला. तसेच अंगणवाडी सुरू होताना जून-जुलै महिन्यात किती मुलांनी प्रवेश घेतला याबाबत सर्वेक्षण अंगणवाडी सेविका मार्फत करणे अपेक्षित असते. 

परंतु अंगणवाडी पर्यवेक्षिका ह्या याबाबत कुठलेही सर्व्हेक्षण न करता आपल्या कार्यालयामध्ये बसूनच या अहवालाला अंतिम रूप देतात. बालविकास प्रकल्प अधिकारी सुद्धा पर्यवेक्षिकाकडून येणारा अहवाल डोळे मिटून मान्य करतात. याच अहवालाच्या आधारावर प्रत्येक अंगणवाडीला किती पोषण आहार द्यायचा हे ठरविले जाते.

प्रत्यक्षात अंगणवाडीमध्ये फक्त 'रेकॉर्ड'वर मुलांची संख्या नोंदविली असते.या मुलांचा पोषण आहार गावात वितरित होत नसल्याचा आरोपही यावेळी गावकऱ्यांनी केला आहे. त्या अंगणवाडी सेविकेला तात्काळ बडतर्फ करून नवीन अंगणवाडी सेविकेची नियुक्ती करावी अशी मागणी आहे.या साठी आज गावकरी जिल्ह्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या दालनात धडकणार.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी