जमिनीतील येणाऱ्या गूढ आवाजाबाबत नागरिकांनी घाबरू नये - जिल्हाधिकारी अभिजित राऊत -NNL

भोकर तालुक्यातील पांडुर्णा, बोरगडवाडी, समुद्रवाडी परिसरात जमिनीतील गूढ आवाजाची भूकंप मापक यंत्रावर नोंद नाही


नांदेड|
भोकर तालुक्यातील पांडुर्णा, बोरगडवाडी, समुद्रवाडी या परिसरात जमिनीतून गूढ आवाज आल्याबाबत ग्रामस्थांकडून सातत्याने विचारणा केली जात आहे. याबाबत अथवा यामुळे काही कंपने जावली का याचा अभ्यास करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या तज्ज्ञ प्राध्यापकांशी चर्चा केली. भूकंप मापक यंत्रावर तशी कोणतीही नोंद नसल्याचे विद्यापिठातील तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले. 

जिल्हा प्रशासनामार्फत भूजल शास्त्रीय पाहणीच्या अनुषंगाने भूजल व कंपन निगडीत बाबीसाठी वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांना वरील बाबीचा अभ्यास करण्यासाठी आदेशीत करण्यात आले होते. त्यास अनुसरून प्राथमिक अहवालानुसार अशा पद्धतीची कंपन हे भूजल पातळीत होणाऱ्या पुनर्भरण अथवा उपसा यामुळे निर्माण होणाऱ्या हायड्रोस्टाटिक दबावामुळे होत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. ही सामान्य बाब असून प्रतिवर्षी बऱ्याच भागात असे जाणवते. गूढ आवाज येणे ही स्थानिक स्वरुपातील बाब असल्याचे यापूर्वी देखील निर्दशनास आले आहे. 

गुढ आवाजाबाबत सखोल अभ्यास करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, नागपूर, राष्ट्रीय भूभौतिकीय अनुसंधान संस्थान हैद्राबाद व नॅशनल सेंटर फॉर सेस्मॉलॉजी कोलकत्ता या केंद्रीय संस्थेचे सहकार्य घेण्यासाठी संपर्क साधला असून या संस्थेमार्फत सूक्ष्म पद्धतीने सर्व घटनांचा अभ्यास करून निष्कर्ष काढण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी