मुखेड तालुक्यातील ३ आरोग्य उप - केंद्रांना मंजुरी आ.डॉ.तुषारजी राठोड -NNL

आरोग्य विभागाच्या पंधराव्या वित्त आयोगातून बांधकामास मान्यता..!


मुखेड, रणजित जामखेडकर|
मुखेड तालुक्यातील मौजे सलगरा खुर्द , उंद्री ( प.दे. ) व गोजेगाव या गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची उपकेंद्रे यापूर्वीच मंजूर झालेली आहेत . परंतु उपकेंद्राची सुसज्ज इमारत बांधकाम न झाल्याने या गावांमध्ये दर्जेदार रुग्णसेवा प्राप्त होत नव्हत्या . या सर्व मंजूर उपकेंद्रांना शासनाकडून इमारतीसाठी प्रत्येकी ६० लक्ष रुपयांचा निधी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या पंधराव्या वित्त आयोगातून मंजूर करण्यात आला आहे , अशी माहिती मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आ.डॉ.तुषार राठोड यांनी दिली.

तालुक्यातील वर्ताळा व सकनुर या आरोग्य उपकेंद्रांना यापूर्वीच आ.डॉ. तुषार राठोड यांच्या प्रयत्नातून प्रत्येकी ६० लाख रुपयांचा निधी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र शासनाकडून प्राप्तझाला आहे . लवकरच यांचे बांधकाम सुरू होणार आहे . मुखेड शहरातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासाठी एक कोटी रुपयांचा निधी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्राप्त झाला असून याची सुद्धा निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे .

हे सुद्धा काम लवकरात लवकर सुरू होणार आहे. दरम्यान, नव्याने प्राप्त झालेल्या तीन उपकेंद्रांच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी लवकरात लवकर यांची सुद्धा निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल व या सुसज्ज इमारती त्या त्या गावांमध्ये उभारल्या जातील, अशी माहिती आ. तुषार राठोड यांनी दिली . शहरात आरोग्य विभागामार्फत हेल्थ अँड वेलनेस सेंटर मंजूर करण्यात आले आहेत . शहरातील विविध तीन भागांमध्ये हेल्थ अँड वेलनेस सेंटर सुरू करण्यात येतील. या ठिकाणी प्रत्येकी एक डॉक्टर व दोन आरोग्य कर्मचारी नियुक्त करून ओपीडी तत्त्वावर हे हेल्थ अँड वेलनेस सेंटर शहरामध्ये कार्यरत राहणार आहेत. आ. डॉ तुषार राठोड यांच्या प्रयत्नातून मुखेड - कंधार विधानसभा मतदारसंघातील आरोग्य सेवा मजबुत होणार असल्याने मतदारसंघातील अनेक नागरिकांनी आ.डॉ.तुषार राठोड यांचे अभिनंदन केले आहेत.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी