श्री. गुरुजी रुग्णालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न -NNL


नांदेड|
श्री गुरुजी रुग्णालय, नांदेड च्या वतीने दि. ३० ऑक्टोबर २०२२ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर” समाजातील सर्व गरजू व मध्यमवर्गीय आणि गरीब रुग्णांना अत्यंत माफक दरात उच्चतम सेवा देण्यासाठी व ग्रामीण व शहरी भागातील जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने शिबिराचे आयोजन केले होते. त्यामध्ये रुग्ण मोठ्या संख्येने सहभागी झाले.

यावेळी रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर वर्ग व टीम उपस्थित होती. त्यांच्या कडून मेडीसीन, अस्थिरोग, डेंटल, सर्जन, स्त्रीरोग व बालरोग ई. विभागांतर्गत रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी व त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे समाजातील सर्वच घटका कडून अभिनंदन केले जात आहे. शिबीर यशस्वीतेसाठी रुग्णालयातील सर्वच अधिकारी व कर्मचार्यांनी  अथक परिश्रम घेऊन शिबीर यशस्वी केले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी