माजी आमदार प्रदीप नाईक यांनी आपला वाढदिवस थाटात साजरा -NNL


किनवट, माधव सूर्यवंशी|
माजी आमदार प्रदीप नाईक यांनी आपला वाढदिवस दरवर्षा प्रमाणे या हि वर्षी लक्ष्मीपुजनाच्या दिवशी साजरा केला यावेळी त्यांना शुभे्च्छा देण्याकरिता किनवट माहुर तालुक्यातील नागरीकांची अलोट गर्दी झाली होती तर यावरुन त्यांची वाढत असलेली लोकप्रियता व आज हि कायम असलेली नागरीकांच्या मनातील स्थान कायम असल्याचे दिसुन येत होते तर त्यांच्या लोकप्रियतेने व उपस्थित जनसमुदायामुळे अनेकांना भुरळ घातली असुन भविष्यात त्यांना रोखने त्यांच्या विरोधकांना म्हणावे तसे सोपे नाही.

माजी आमदार प्रदीप नाईक यांची वरचष्मा हा किनवट माहुर विधानसभा क्षेत्रातील नागरीकांवर आज हि कायम असुन त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याकरिता त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी ना- ना पध्दतीचा वापर केला होता. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड, माहुरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी, युवानेते राहुल नाईक यांनी अनुक्रमे १० फुट रुंद तर २०० फुट लांब व १०० फुट लांब असे बॅनर लावुन माजी आमदार नाईक यांना शुभेच्छा प्रदान केल्या वरिल तीन हि बॅनर हे किनवट माहुर तालुक्यात चर्चेचा विषय असुन ग्रामिण भागातुन नागरीक ते पाहण्याकरिता शहरात येत आहेत. माजी आमदार प्रदीप नाईक यांचा वाढदिवस साजरा करण्यात त्यांच्या समर्थक कार्यकर्ते व पदाधिका-यांनी कोणतीहि कसर सोडली नाही.  सारखणी भागातील युवक कार्यकर्त्यांनी जवळपास ५१ फुट लांबीचे पुष्पहार माजी आमदार प्रदीप नाईक यांना अभिष्ठचिंतन करण्याकरिता आणले होते. 

माजी आमदार प्रदीप नाईक हे दरवर्षी आपला वाढदिवस लक्ष्मीपुजनाच्या दिवशी साजरा करतात त्यांच्या दहेली तांडा येथिल निवास्थानी छोटेखानी कार्यक्रमात ते वाढदिवसाच्या शुभेच्छा स्विकारतात तर त्यानिमित्त येणा-यांना अल्पोहाराची व्यवस्था केली जाते. तर या वर्षी उपस्थित नागरीकांची संख्या लक्ष्यनिय होती तर आलेल्या अलोट गर्दी मुळे त्या ठीकाणी भावनिक वातावरण निर्माण झाले होते. तर पारंपारीक बंजारा, आदिवासीसह विविध प्रकारचे वाजंत्री समुह, गट, नृत्य करणारे समुह गट त्या ठीकाणी आपले कला सादर करत माजी आमदार प्रदीप नाईक यांना शुभेच्छा दिल्या तर या कार्यक्रामाकरिता जवळपास सर्वच वर्तमानपत्रांनी आपल्या वृत्तपत्राचे काढलेले विशेषअंकाचे प्रकाशन केले. तर नाईक यांना शुभेच्छा देण्याकरिता विविध पक्षाचे, विविध संघटनेचे, व्यापारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, कष्ठकरी, मजुर, सर्वसामान्य नागरीकांनी अलोट गर्दी यावेळी केली होती.

यावेळी उपस्थित जनसमुदायांची सर्वच्या सर्व नावे नोंद घेणे हे कोणत्याही पत्रकार वार्ताहारांना शक्य नव्हते. परंतु काही प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची नावे नोंदवण्याचा प्रयत्न केला असता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे ता. अध्यक्ष प्रकाश राठोड, मेघराज जाधव, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे, कॉग्रेस चे ता. अध्यक्ष सुर्यकांत रेड्डी, प्रशांत रेड्डी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, माजी जिल्हा परिषद सदस्य बंडु नाईक, माजी नगराध्यक्ष साजिद खान, माजी नगराध्यक्ष के.मुर्ती, माजी नगराध्यक्ष अरुन आळणे यांनी सहकुटूंब उपस्थिती दर्शवली तर उपस्थितीतांना घड्याळ भेट दिली, गटनेते जहिरोद्दीन खान, वैजनाथ करपुडे पाटील, बाजार समितीचे सभापती अनिल पाटील, जिल्हा परिषद सदस्य मधुकर बाबा राठोड, प्रविण राठोड, युवा नेते राहुल नाईक, जि.प. सदस्य प्रविण म्याकलवार, ता. सचिव कचरु जोशी, डॉ. रोहिदास जाधव, युवानेते बालाजी बामने,  किनवटचे उयोजक श्रीनिवास नेम्मानिवार, मुकुंद नेम्मानिवार, प्रा. पुरषोत्तम येरडलावार, डॉ ऐटवार, कुंदन पाटील पवार, लक्ष्मण मिसेवार, विशाल जाधव, अंकुश जाधव, गजानन मिसेवार, मुज्जु चाउस, आशिष नाईक, समद फाजलाणी, अमजद पठाण, 

आदिवासी महासंघाचे विजय खुपसे, जयवंत वानोळे, पंचायत समिती सदस्य डॉ वानोळे, घोटीचे उपसरपंच राजु पाटील सुरोषे, जिल्हा परिषदेचे दत्ता कसबे, कारभारी संतोष सुरोशे, मांडवा इरपेनवार सर, अजित साबळे, बाजार समितीचे संचालक पंडित राठोड, कोळी महासंघाचे श्रीकांत बोईनवाड, युवानेते प्रबोध मधुकर राठोड, कैलास मधुकर राठोड, इस्लापुर जि.पचे डॉ गंगासागर, बाळु शेरे, प्रमोद राठोड, मनोज जाधव, बंडु जाधव, बबलु आडे, बळीराम राठॉड, भगवान जोगदंड सर, देवराव तिरमनवार, उद्योजक निखिल जाधव, पिंपळगावचे सरपंच श्रीकांत शेडमाके, सदस्य गजानन मांडादे, प्रफुल्ल राठोड, अंबाडी सरपंच प्रेमसिंग जाधव, पंचर गुलाब, शेख अफरोज, ताहेर भाई,  ्गजानन बोलचेट्टीवार, गंगाधर बट्टलवार, इश्वर जाधव, महेश तंबाखुवाला, शांतीलाल चव्हांण, निर्गुण पाटील, प्रमिल नाईक, रा.कॉ.चे ज्येष्ठ शिवाजीराव घोगरे पाटील, भोजराज देशमुख, अमित येवतिकर, जगदिश कोमरवार यांच्यासह ग्रामिण भागातील असंख्य समर्थक, शेतकरी, माजी आमदार नाईक यांचे स्नेहि मोठ्यासंख्येने उपस्थित होते तर मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी पत्रकार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यावसायीक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी