वीज पडून एका शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू -NNL


धर्माबाद/नांदेड|
जिल्ह्यातील धर्माबाद येथे गुरुवारी विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. वीज पडून एका शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. स्वाती कामाजी आवरे (१५) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. 

धर्माबाद तालुक्यातील चिकना येथील रहिवासी असलेली कु.स्वाती ही धर्माबाद येथील जिजामाता कन्या शाळेत इयत्ता नववीमध्ये ती शिक्षण घेत होती. चिकना ते धर्माबाद येथे शाळेसाठी ती रोज ये-जा करते. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास विजांचा कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी शाळा सुटल्यानंतर चिकना या गावाकडे जाण्यासाठी स्वाती धर्माबाद येथील बसस्थानकाकडे जात होती. 

याच वेळी तिच्या अंगावर वीज पडली. स्वातीला धर्माबाद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वेणुगोपाल पंडित यांनी मृत घोषित केले. स्वाती आवरेसोबत दोन मैत्रिणीही बसकडे जात होत्या. परंतु, त्या थोडे पाठीमागे असल्यामुळे थोडक्यात बचावल्या. कामाजी आवरे यांची स्वाती एकुलती एक मुलगी होती. चिकना गावावर शोककळा पसरली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी