खासदार डॉ. श्रीकांत शिंदे – मंत्री अब्दुल सत्तार यांची कळमनुरीच्या शिवसेना संपर्क कार्यालयास भेट -NNL


नांदेड/हिंगोली।
कल्याण लोकसभा मतदार संघाचे संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार नेहमीच आपल्या कार्यतत्परतेमुळे ओळखले जातात. हिंगोली जिल्ह्याच्या अतिशय व्यस्त दौऱ्यात असतांना देखील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या वेळातला वेळ काढुन कळमनुरी येथील खासदार हेमंत पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली.  

कळमनुरी येथे शुक्रवारी (दि. २८) भाऊबीज कार्यक्रमानिमित्त ते हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यान खासदार हेमंत पाटील यांनी यावेळी  शाल श्रीफळ देऊन संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. 

याप्रसंगी खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली लोकसभा मतदार संघात मागील काही दिवसांपासून संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिके पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मतदारसंघातील शेतकरी मोठ्या प्रमाणात हवालदिल झाला आहे. शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त अतिवृष्टी अनुदान व पिक विमा देण्यात यावा यासंदर्भात राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार  यांच्याकडे मागणी केली. असता कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व पिक विम्यासंदर्भात सर्वती मदत मिळवून देण्यार असल्याचे खासदार हेमंत पाटील यांना अश्वासन दिले. 


यावेळी उपस्थित हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर, जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर , जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, वसमत तालुकाप्रमुख राजु चापके, कळमनुरी तालुकाप्रमुख जयदीप काकडे,माजी जि.प. सदस्य रवी नादरे, शहरप्रमुख प्रभाकर क्षिरसागर, माजी सभापती रामकिशन झिंजुर्डे, मा. शहरप्रमुख बाबा आफुणे, जनसंपर्क अधिकारी अमोल बुद्रुक, आकाश रेड्डी, श्याम वानखेडे, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी