कोबींग ऑपरेशन दरम्यान 01 गावठी पिस्टल व 02 तलवारीसह तिन आरोपीतांना अटक -NNL

नांदेड शहरात घेण्यात आलेले कोबींग ऑपरेशन दरम्यान नांदेड पोलीसांची जोरदार कामगीरी


नांदेड|
मागिल 
गुन्ह्यातील आरोपी शोध, अग्नीशस्त्र बाळगणारे, दरोडा, जबरी चोरी करणारे आरोपी, पाहिजे-फरारी आरोपी शोध, समन्स- वॉरंट, पोटगी वॉरंट व गुन्हे प्रतिबंध अनुषंगाने मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी दिनांक 21/11/2022 रोजी 04.00 ते 09.00 वाजे पावेतो कोबींग ऑपरेशन राबवण्याबाबत आदेशीत करुन ते स्वत: हजर होते. कोबींग ऑपरेशन नांदेड शहरातील सहा पोलीस ठाणे हद्यीत राबवण्यात आले असुन प्रत्येक पोलीस ठाणे हद्यीमध्ये कोबींग ऑपरेशनसाठी एक उप विभागीय पोलीस अधिकारी यांचे अधिपत्याखाली पथके तयार करण्यात आली होती. तसेच स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडचे वेगवगेळी तिन पथके तयार करुन कोबींग ऑपरेशन राबविण्यात आले आहे. कोबींग ऑपरेशनसाठी श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक नांदेड हे स्वत: हजर होते.

कोबींग ऑपरेशन नांदेड शहरातील 06 पोलीस ठाणे हद्यीमध्ये राबविण्यात आले असुन कोबींग ऑपरेशनसाठी एकुण 05 उप विभागीय पोलीस अधिकारी, 07 पोलीस निरीक्षक, 34 सपोनि / पोउपनि, 150 पोलीस अमंलदार, 60 पंच व 30 कॅमेरामन असे मनुष्यबळ वापरण्यात आले आहे. कोबींग ऑपरेशन दरम्यान माली गुन्ह्यातील आरोपी (दरोडा, जबरी चोरी, चोरी, घरफोडी करणारे) एकुण - 70 आरोपी चेक करुन त्यांची झडती घेण्यात आली आहे. शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हे करणारे एकुण - 35 आरोपी चेक करुन त्यांची झडती घेण्यात आली आहे. रेकॉर्ड वरील पाहिजे- फरारी आरोपी एकुण - 05 अटक करण्यात आले आहेत तसेच नॉन बेलेबल वॉरंट मधील आरोपी चेक करुन 13 आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे.
कोबींग ऑपरेशन दरम्यान स्था. गु. शा. नांदेड कडुन 03 तलवारी, 02 गावठी पिस्टल, 01 खंजर जप्त करुन 04 आरोपीतांना ताब्यात घेवुन शस्त्र अधिनियम प्रमाणे 03 केसेस दाखल करण्यात आले आहे. पो. स्टे. इतवारा कडुन 01 तलवार जप्त करुन 01 आरोपी विरुध्द शस्त्र अधिनियम प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. तसेच कोबींग ऑपरेशन दरम्यान 08 प्रोव्हिशन रेड करुन 64,500/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. मोटार वाहन कायदा प्रमाणे 03 केसेस करुन 1500/- रुपयाचा दंड वसुल केला असुन 03 बेवारस वाहने जप्त करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी स्वत: कोबींग ऑपरेशन राबविले असुन त्यामध्ये अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, श्रीमती शफकत आमना, सहा. पोलीस अधीक्षक भोकर, सिध्देश्वर भोरे, उप विभागीय पोलीस अधिकारी इतवारा, चंद्रसेन देशमुख, उप विभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर, सचिन सांगळे, उप विभागीय पोलीस अधिकारी देगलुर, विक्रांत गायकवाड उप विभागीय पोलीस अधिकारी धर्माबाद, शहरातील सहा पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक स्थागुशा, नांदेड, 34 सपोनि / पोउपनि व 150 पोलीस अमंलदार हजर होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी