सरसम येथील अंत्यविधी उरकून परत येणाऱ्या स्वर्गरथ उलटला; 12 जखमी 5 गंभीर जखमींना नांदेडला हलविले -NNL


हिमायतनगर।
तालुक्यातील मौजे सरसम बु. येथील अंत्यविधीचा सोपस्कार उरकून परत येत असलेल्या स्वर्ग रथाचा हिमायतनगर जवळुन3 किमी अंतरावर असलेल्या दारूम उलुम नजीक भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत 12 जण  जखमी झाले असून. 5 गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु. येथे परसराम कांबळे यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या अंत्यविधी साठी नातेवाईक गेले होते. तो अंत्यविधी विदर्भातील उरकून धानोरा, चातारी, खरूज, उमरखेड येथील पाहुणे मंडळी हिमायतनगरकडे स्वर्ग रथाने येत होते. दरम्यान स्वर्गरथ भोकर हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील खडकी पाट्या समोरील दारू उलुम येथे येताच स्वर्ग रथामध्ये बिघाड होऊन पाटे तुटले त्यामुळे स्वर्गरथ पलटी झाला. यात बसून प्रवास करणारे 8 ज्येष्ठ महिला व 4 पुरुष हे जखमी झाले आहेत. 


यात सुनंदा दिलीप कांबळे चातारी,ता उमरखेड वय 40 वर्ष, दिलीप कांबळे चातारी ता. उमरखेड, मिराबाई पांडुरंग तुळसे धानोरा ता हिमायतनगर वय 55 वर्ष, पुण्यरथा भारत साखरे रा. गांजेगाव तालुका उमरखेड वय 57 वर्ष, गंगाराम संभाजी कांबळे खरुस ता. उमरखेड वय 75 वर्ष, सुदाम बाळू वाठोरे रा. खरूस ता.उमरखेड वय 65 वर्ष, पांडुरंग दत्ता वाठोरे रा. सिरंजनी तालुका हिमायतनगर वय 67 वर्ष, वच्‍छलाबाई पांडुरंग वाठोरे रा. सीरंजनी ता. हिमायतनगर,  प्रयागबाई प्रल्हाद तुळसे रा. धानोरा ता. हिमायतनगर वय 60 वर्ष, शांताबाई दिगंबर तुळसे राहणार धानोरा तालुका हिमायतनगर वय 62 वर्ष, सगुना मधुकर तुळसे रा. धानोरा वय 35 वर्ष, संगीताबाई उत्तम तुळसे रा. धानोरा वय 46 वर्ष हे जखमी झाले आहेत. या सर्व जखमी रुग्णांना हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील 5 गंभीर जखमी रुग्णांना पुढील उपचारासाठी नांदेडला रवाना करण्यात आले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी