आलेगाव येथील प्रयोगशील शेतकऱी बंधूंनी एका वर्षात टोमॅटो शेतीतुन कमवले तब्बल 13 लाखाचे उत्पन्न -NNL

भावा वावर है तो पॉवर है..! 


उस्माननगर, माणिक भिसे।
आलेगाव ता.कंधार येथील तीन  शेतकरी  बांधवांनी आपल्या शेतात विविध प्रकारच्या फळभाज्यासह टोमॅटो पिकवून शेतीतून एका वर्षात १३ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न काढलें आहे.

 गेल्या अनेक वर्षांपासून शेती व्यवसायात सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने आता अनेक नवयुवक शेतकरी पुत्र उच्च शिक्षण घेऊन   शेती व्यवसायापासून दुरावत चालले आहेत. आता नवयुवक शेतकरी पुत्र शेती नको रे बाबा असं म्हणत नोकरी व उद्योगधंद्याकडे वळू लागले आहेत.


मात्र जर शेती व्यवसायात काळाच्या ओघात बदल केला आणि कमी कालावधीत काढणीसाठी येणाऱ्या पिकांची लागवड केली तर निश्चितच शेती व्यवसायातून हजारोंची नव्हे तर लाखोंची कमाई करता येणे शक्य आहे दाखुन दिले आहे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील आलेगाव येथील प्रगतिशील शेतकरी प्रशांत मोरे यांनी कृषी पदवी घेऊन नौकरी च्या मागे न लागता घरची परिस्थिती जेमतेम असताना मनात जिद्द ठेऊन काहीतरी जोड व्यवसाय सुरू करावा ही मनात खून गाठ बांधून कृषी सेवा केंद्र सुरू करण्यात आले. 


पट्या इथेच न थाबता  बघता बघता तीन कृषी सेवा केंद्र वेगवेगळ्या गावात सुरू केली.आणि आता या अवलिया शेतकऱ्याने शेतीमधून लाखो रुपयांची कमाई करता येणे शक्य असल्याचे दाखवून दिले आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्याच्या मौजे आलेगांव येथील प्रशांत आणि शहाजी.तिरुपती मोरे या तिन्ही भावांनी टोमॅटो शेतीतून (Tomato Farming) लाखो रुपयांची कमाई करण्याची किमया साधली आहे.

खरं पाहता कंधार तालुक्यात मण्याड नदीच्या आजुबाजूस ऊस हे एक मोठे नगदी पीक (Cash Crop) आहे. मात्र असे असले तरी  या तिन्ही बंधूंनी बाजारपेठेचे गणित ओळखून व हवामान बदलाचा अभ्यास करून टोमॅटो शेती करण्याचा विचार केला. या अनुषंगाने या तिन्ही बंधूंनी आपल्या दिड एकर क्षेत्रात टोमॅटो लागवड केली. एका वर्षात टोमॅटोची दोनदा लागवड करून या बंधूंनी 13 लाख 50 हजार रुपये उत्पन्न कमावले आहे. यामुळे सध्या हे तिघे भाऊ तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहेत.

मोरे बंधूंनी गत वर्षापासून हंगामी पिकांची लागवड करण्यास सुरवातं केली आहे. या अनुषंगाने ते आपल्या 10 एकर क्षेत्रा पैकी 4 एकर भाजीपाला वर्गीय पिकांची शेती करत आहेत. भाजीपाला वर्गीय पिके कमी कालावधीत अधिक उत्पन्न देत असल्याने त्यांना यातून चांगला नफा देखील मिळतं आहे.

मोरे बंधू आपल्या 4 एकर क्षेत्रात टोमॅटो , काकडी ,दोडका,वारणा , कोथींबीर याच बरोबर टरबूज हंगामी पिकांची लागवड करत आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांनी आपल्या दिड एकर वावरात टोमॅटो लागवड केली होती, बाजारात टोमॅटोला अपेक्षित बाजार भाव मिळाल्याने त्यांना यातून तब्बल 10 लाख 50 हजाराचे रुपयांचे उत्पन्न मिळाले.2 लाख खर्च वजा करता त्यानां 8 लाख 50 हजार रुपये निव्वळ नफा झाला. टोमॅटो पिकातून मिळाले 8लाख 50 हजार  रुपयांचे नफा उत्पन्न लक्षात घेता त्यांनी पुन्हा जूले महिन्यात टोमॅटोची दुसऱ्यांदा लागवड केली. यातून त्यांना तब्बल 3 लाख  रुपये उत्पन्न मिळाले आहे. म्हणजेच वर्षभरात टोमॅटो पिकातून त्यांना तब्बल 13 लाख 50 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

मोरे बंधूंनी भाजीपाला पिकातून देखील लाखो रुपयांची कमाई केली जाऊ शकते हे दाखवून दिले आहे. मोरे बंधूंनी शेतकरी बांधवांना बाजारपेठेतील अंदाज पाहून पिकांची लागवड करण्याचा सल्ला दिला आहे. निश्चितच या  तिन्ही बंधूंनी शेती व्यवसायात साधलेली ही प्रगती इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारी आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी