लोकनेते बाबुरावजी कोहळीकरांचे प्रयत्न ...हदगाव व हिमायनगर तालुक्यात MIDC उभारणार -NNL


हदगाव, शे. चांदपाशा।
मुंबई येथे राज्याचे उद्योग मंत्री मा.ना.उदयजी सामंत साहेब यांची बाबुरावजी कदम कोहळीकर यांनी हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात एमआयडीसी उभारण्याची मागणी निवेदनाद्वारे केली असता, मा.मंत्री महोदय यावेळी लवकरच एमआयडीसी उभारण्याचे आश्वासन दिले. 

या निर्णयामुळे हदगाव व हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात उद्योग उभारणीस चालना मिळणार असून, त्यामुळे अनेक युवकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लोकनेते  बाबुरावजी कदम कोहळीकर यांच्या समवेत कळमनुरी विधानसभेचे आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख आ.संतोष बांगर साहेब उपस्थित होते     

विशेष म्हणजे हदगाव शहराच्या जवळ तामसा रोडवर MIDC जागा 15वर्षापुर्वी अधिग्रहण केली होती. पण कुठं माशी शिकली तिथे उद्योग येण्या ऐवजी तिथे खाजगीरित्या भुखंड पाडण्यात येवून खाजगी इमारती उभे राहत आहेत. माञ MIDC बोर्ड माञ तिथेच आहे ..

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी