दुचाकी मोटरसायकलवरुन पडून एकाचा मृत्यू; उस्माननगर येथील घटना -NNL


उस्माननगर, माणिक भिसे।
नांदेड ते उस्माननगर राष्ट्रीय महामार्गावर हाॅटेल शंभूराजे हाॅटेलचे मालक हे मोटरसायकलवरुन पडून मयत झाल्याची घटना घडली 

हाॅटेल शंभुराजेचे मालक बाबू विठ्ठलराव विश्वासराव ( धर्मापुरीकर) हे नेहमी प्रमाणे दि. ९ नोव्हेंबर बुधवारी दिवसभर हाॅटेल मध्ये  बसून  गिऱ्हाईक केले. गिऱ्हाईक करत करत सकाळची व्यवस्था लावून  नेहमीप्रमाणे सायंकाळी साडेआठच्या दरम्यान गावातील मित्र  बिबन  फकीर यांना हात दाखवून घराकडे जाण्यासाठी मोटर सायकलवर  बसून येत आसताना  शादूल कुरेशी यांच्या शेताजवळ छोटासा अपघातात झाला.

यामध्ये बाबू विश्वासराव वय ४७ वर्ष यांच्या  डोक्याला  मार लागल्यावर रक्तस्त्राव होत असल्याने  तात्काळ  यशोसाई हाॅस्पिटल नांदेड येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.पण डॉक्टर  यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. बाबुराव विश्वासरावचे  मूळ गाव मजरे धर्मापूरी तां. कंधार  येथील  रहिवासी असून  सध्या ते उस्माननगर  येथे बरेच  वर्षा पासुन  वास्तव्यास आहेत .ते मनमिळाऊ स्वभावाचे  होते.  

नाटकातील कलेपासून  ते  दुकान, शिल्पकार, हे कामे करीत करीत  वहाने  घेतल्या त्यानंतर नंतर एका वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गावर उदासी चौक येथे हॉटेल शंभुराजे हाॅटेल टाकले ह्या हाॅटेल  मुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीचे झाले होते या हॉटेलमध्ये लांब वरून ह्या मार्गावरून ये- जा करणा-या प्रवाशाची चहा फराळाची उत्तम सोय होत असल्यामुळे प्रवाशाची जास्त गर्दी होत असे .,बाबुराव विश्वासराव यांच्या अपघाती निधनामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात आई,पत्नी, दोन मुले ,एक मुलगी, सून असा परिवार आहे येथील समशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी