पुरवठा विभागाच्या दक्षतेमुळे सर्वसामान्याची वेळेत दिवाळी साजरी झाली -NNL


हदगाव, शे.चांदपाशा।
महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिपावलीच्या पार्श्वभूमीवर 'आनंदाचा शिधा दिपावली किट 'हदगाव शहरासह तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात हदगाव तहसिल कार्यालयच्या पुरवठा विभागाच्या दक्षते मुळे वेळेवर सर्वसामान्य रेशनधारकांना वेळेवर मिळाल्याने अनेक शिधाधारकांना दिपावळी वेळेवर साजरी करण्यात आली. या निमित्तानं तालुक्यातील अनेक गावाच्या शिधापत्रिका धारकांनी तहसिल कार्यालय येथे येवुन पुरवठा आधिकारी विजय येरावाड व त्यांच्या विभागातील कर्मचा-याचे अभिनंदन केले आहे.

हदगाव तालुक्यात ऐन दिपावाळीच्या पार्श्वभूमीवर 'अंनदाचा शिधा दिपावली किट' वाटप करावायाचे होते पुरवठा अधिकारी व त्यांच्या सहकार्याने तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकाच्या संबधिताशी या काळात नियमित संपर्कात ठेवून जिथे ईपाँश मशिनची तांत्रिक अडचण येईल तिथे पर्यायी मार्ग शोधून शिधाधारक लाभर्थाना अंनदा शिधा किट देण्यात आल्या विशेषतः हदगाव तालुक्यात अतिदुर्गम भाग म्हणजे आदीवासी भागात जसे तामसा व मनाठा या भागात असे गाव आहेत की जसे धान्याची वाडी .वारकवाडी टाकळवाडी अशी गावाची संख्या खुप आहे दुर्गम भागात सर्वात प्रथम ही शिधा किट शिधाधारकांना देण्यात आल्या मुळे तेथील सर्वसामन्याची या शिधा किट मुळे दिपावळी गोड झाल्याचे तेथील लाभर्थ्यानी सागितले.

सर्वांच्या सहकार्याने हे काम झाले /पुरवठा अधिकारी विजय येरावाड हे काम करायचे हे आमचे प्रशासकीय काम आहे शासनाचे दिपावळीच्या पार्श्वभूमीवर 'आनदाचा शिधा दिपावली किट लाभार्याना वेळेवर दिलं याचा मला मनस्वी आनंद होत असल्याच पुरवठा अधिकारी विजय येरावाड यांनी सागितले ते अधिक माहीती देतांना सागितले की याकामी हदगाव तहसिल कार्यालयाचे तहसिलदार जीवराज डापकर यांच्या मार्गदर्शनाखाली  पुरवठि विभागाच्या कर्मचा-यानी अहोराञ मेहनत घेतली. 

हदगाव तालुक्यात शासकीय गोडाऊन हदगाव तामसा या ठिकाण आहेत स्वस्त धान्याची एकूण 173 असुन लाभर्थीची संख्या या मध्ये प्राधान्य कुंटुब लाभर्थी 35 273 व शेतकरी लाभर्थी 11983 असे एकूण 54075 लाभर्थी असल्याची त्यांनी माहीती दिली दिपावळीच्या पार्श्वभूमीवर साखर .रवा पामतेल चनादाल. स्वस्त धान्य दुकानदारांना वितरित करण्यात देण्यात आले होते लगेच त्यांना काही तांत्रिक  अडचण असल्यास लगेच कोणत्याही क्षणी पुरवठा विभागाच्या संपर्क साधता यावा या करिता तात्पुरता  मोबाईल क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला होता याचा स्वस्त धान्य दुकानदाराना फायदा झाला  या कामी शहरातील व परिसरातील राजकीय पदाधिकारी .माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते संरपच स्वस्त धान्य दुकानदार पञकार यांनी सहकार्या लाभल्याचे ही पुरवठा अधिकारी विजय येरावाड यांनी सागितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी