पत्नीचे चारीत्र्यावर संशय घेऊन चाकू हल्ला; युवक गंभीर; परस्पर विरोधी गुन्हे दाखल -NNL

हिमायतनगर तालुक्यातील मौजे सोनारी येथील घटना 


हिमायतनगर|
सोनारी येथे एका दुकानदाराने त्याच्या बायकोच्या चारित्र्यावर संशय घेऊन मोटार सायकलवर जाणाऱ्यास अडवून छातीवर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. हि घटना दिनांक ११ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत युवक गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील मौजे सोनारी येथे प्रकाश भगवान सोळंके यांचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे शाहरुख वजीर बेग हा त्यांच्या दुकानासमोरून दिनांक ११ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दुचाकीवर जात होता. यावेळी  प्रकाशने त्याच्या पत्नीचे चारीत्र्यावर संशय घेवुन शाहरुख वजीर बेगची मोटारसायकल आडवुन तुला खतम करतो म्हणुन त्याचे हातातील चाकुने छातीवर वार करून गंभीर जखमी करून खुन करण्याचा प्रयत्न केला. जखमीला तातडीने सरसम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविले आहे.

या प्रकरणी जखमी मुलाचे वडील वजीरबेग हबीबबेग, वय ७२ वर्षे, व्यवसाय शेती रा. सोनारी ता. हिमायतनगर जि. नांदेड यांनी फिर्याद दिल्यावरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात आरोपी प्रकाश भगवान सोळंके यांचेवर गुरन २४६/२०२२  कलम ३०७, ३४१, भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बी. डी. भूसुनूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी हे करीत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी खुणाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस अटक केली असून, आज न्यायालयात हजार केले आहे.

तर या प्रकरणी आज प्रकाश भगवानराव सोळंके वय २७ वर्षे राहणार सोनारी यांनी परस्पर तक्रार दिल्यावरून आरोपी शाहरुख वजीर बेग, आश्रफ इकबाल बेग दोघे राहणार सोनारी आबादी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे कि, दिनांक ११ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास यातील आरोपीताने संगणमत करून प्रकाश यांच्या घरात वाकून बघत असताना फिर्यादीने आरोपींना माझ्या घराकडे वाकून काय..? बघत आहे. असे म्हणाले असता आरोपी शाहरुख वजीर बेग, आश्रफ इकबाल बेग या दोघांनी लाथा बुक्क्यांनी प्रकाशला मारहाण केली. आणि रोडवर पाडून प्लास्टिक काठीने पाठीवर, कपाळावर, हातावर, पायावर मारहाण करून जखमी केले. यात जखमी झालेल्या फिर्यादीने उपचार करून आज रोजी तक्रार दिल्यानंतर हिमायतनगर पोलीस ठाण्यात आरोपी शाहरुख वजीर बेग, आश्रफ इकबाल बेगवर कलम ३२४, ३४, ३२३ भादंवि अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बी. डी. भूसुनूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्टेबल श्री पोटे हे करीत आहेत. एकूणच या घटनेवरून परसपर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आल्याने पोलिसांना घटनेचा सखोल तपास करून सत्य उजेडात आणावे लागणार आहे. 


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी