अर्धापूर तालुक्यात भारत जोडो यात्रेचे जंगी स्वागत; पार्डी व चोरंबा येथे लोटला जनसागर -NNL


अर्धापूर|
भारत जोडो यात्राचे तालुक्यात दाभड,वसमत फाटा, अर्धापूर,पार्डी,शेनी फाटी,चोरंबा पाटी,येथे जंगी स्वागत करण्यात आले.पार्डी येथे दुपारच्या जेवनाची व्यवस्था करण्यात आली होती.

भारत जोडो यात्रेचा पिंपळगाव (म) येथे मुक्काम होता, सकाळी सेवादलाचे ध्वजारोहण करुन यात्रैला प्रारंभ झाला. दाभड, भोकरफाटा, वसमत फाटा, अर्धापूर,बसवेश्र्वर चोक,शेणी फाटा,पार्डी (म) येथे पदयात्रा आली, अर्धापूरात संजय देशमुख लहानकर, पप्पू पाटील कोंढेकर,राजेश्वर शेटे, बालाजी गव्हाणे, नगराध्यक्ष छत्रपती कानोडे,प्रवीण देशमुख,गाजी काजी, राजू बारसे,मोतिराम जगताप, साहेबराव राठोड,व्यंकटराव साखरे,सलीम कुरेशी, व्यंकटी राऊत, रणजितसिंह कामठेकर, दिगंबर तिकडे, पंडीत लंगडे,अबूझर बेग,शेख मकसूद,मदन देशमुख, अशोक सावंत, संजय लोणे,ज्ञानेश्वर राजेगोरे,नवनाथ कपाटे,आर आर देशमुख,अमोल डोंगरे,शंकर टेकाळे,राजू कल्याणकर,विशाल लंगडे,शंकर ढगे,नामदेव दुधाटे,सरोदे यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.

येथून दुपारच्या विश्रांतीसाठी पार्डी (म) येथे आगमन झाले,पार्डी (म) येथे मोठा जनसमुदाय जमला होता. मनपाचे सभापती किशोर स्वामी यांच्या फार्महाऊसवर जेवणाचे नियोजन केले, जिल्हा सचिव निळकंठराव मदने, गंगाधरराव देशमुख,पंजाबराव देशमुख,मारोतराव देशमुख, विठ्ठलराव देशमुख, गीरधारी मोळके, अनिल मोळके,बंन्टी राठोड, संजय मोळके,शंकर हापगुंडे, नारायणराव देशमुख,श्याम गीरी, प्रसाद हापगुंडे,गजानन हापगुंडे, प्रा.संजय हापगुंडे,दता देबगुंडे,सुनिल देबगुंडे,राजकुमार मदने, संतोष हापगुंडे,शिवशंकर दहिभाते, ज्ञानेश्वर दहिभाते,आनंदराव घुमनर,गजानन देबगुंडे,गोविंद माऊली, किशनराव मरकुंदे,शेख युनुस,शेख गुलाब, पांडुरंग डोईफोडे यांनी यात्रेचे जंगी स्वागत केले.

यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे यात्रेचा आढावा घेत समोर आले असता त्यांचा पार्डी येथे बसस्थानक परिसरात निळकंठराव मदने यांनी  गांधी टोपी,तिरंगा रुमाल व शाल,हार देऊन  स्वागत करण्यात आले, यावेळी त्यांनी उपस्थीतांना हात वर करून प्रतिसाद देत बिमार अवस्थेत एक महिना काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शरीराची काळजी घ्या असा आपुलकीचा सल्ला दिला, त्यामुळे बिमार अवस्थेत असणारे कार्यकर्ते भारावून गेले,खा.राहुल गांधी यांनी पायी चालत उपस्थीतांच्या भावनांचा आदर केला.

किशोर स्वामी यांच्या फार्महाऊसवर राहुल गांधी यांच्या तर कार्यकर्त्यांसाठी गंगाधरराव देशमुख यांच्या शेतात दुपारच्या जेवनाची उत्तम प्रकारे व्यवस्था करण्यात आली होती,याकामी गावकऱ्यांनी सहकार्य केले. शेणीफाटा येथे फुलांनी सजविला होता, यावेळी डॉ आनंद शिंदे,बाळू पाटील धुमाळ,रमेश पाटील धुमाळ, दादाराव शिंदे, शंकरराव शिंदे,सचीन शिंदे, रवी कुमार शिंदे, आनंदराव पाटील यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.तर चोरंबा येथे आ.माधवराव पाटील जवळगावकर,आनंद भंडारे, डॉ राजेश बाजगीरे, दिलीपराव देबगुंडे, ज्ञानेश्वर देबगुंडे,संजय मोळके, रघुनाथ राठोड यांच्यासहित आदिंची उपस्थिती होती.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी