वै.वटेमोड महाराजांचे विचार समाजाला आजही प्रेरणादायी : डॉ. धोंडिराम वाडकर -NNL


मुखेड, रणजित जामखेडकर|
वै.वटेमोड महाराजांच्या सहाव्या पुण्यस्मरणा निमित्त खैरकावाडी (गोकूळवाडी) येथे विठूमाऊली प्रतिष्ठापनाची स्थापना करण्यात आज आली, यावेळी इयत्ता १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा व सेवाभावी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला, वै.वटेमोड महाराज हे युगपुरुष होते. त्यांनी समाजात नवचैतन्य निर्माण केले. समाजामधील वाईट चालीरीती.

अज्ञान अंधश्रद्धा बाजूला सारून शिक्षणाचे महत्त्व सर्वांना पटवून दिले, म्हणूनच वै. वटेमोड महाराजांचे विचार आजही समाजाला प्रेरणादायी आहेत. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ.धोंडिराम वाडकर यांनी मांडले.तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री शिवाजी कोनापूरे यांनी वै. वटेमोड महाराज आणि त्यांचा जीवन प्रवास याविषयी सविस्तर माहिती दिली. डॉ.रणजित काळे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन केले. दत्त संस्थानाचे महंत माधव पुरी यांनी पूर्वीचा काळ आणि आताचा काळ यातील साधर्म्य साधून विद्यार्थ्यांशी संवाद साधले, प्रा.सुभाष हिवराळे यांनी गुणवंत मुलींना पुढे जाण्यासाठी मोठे स्वप्न पाहून चालत नाही, तर प्रत्यक्ष कृती करून आपली ध्येय गाठावे, मुलीने जास्तीत जास्त अभ्यास करून आपल्या आई-वडिलांची व देशाची नाव उज्वल करावे असे सांगितले.

श्री अविनाश तलवारे सरांनी प्राचीन संस्कृती विषयी व छोट्या गावातील एवढ्या मोठ्या संख्येने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले, तर श्री हानमंत आटोळकर यांनी अध्यात्म व शिक्षण यांची सांगड घालून तसेच आज समाजात वाढलेला ढोंगीपणा परखडपणे सांगून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी ज्येष्ठ नागरिक श्रीमती गंगाबाई मारोती शिरबरतळ श्रीमती राजाबाई बाबाराव शिरबरतळ, श्री घंटेवाड दत्तात्रय मारुती, यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गोल्ला,गोलेवार समाज गोकुळवाडी शाखाप्रमुख श्री गोविंद शंकर शिरबरतळ , तसेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत खंडेश्वर विठ्ठल नकुलवाड हा पात्र झाला, त्यांचा ही सत्कार करण्यात आला.

गुणवंत विद्यार्थी म्हणून शंकर विनायक शिरबरतळ, कपिल मारोती शिरबरतळ, कु.बरसमवाड मुक्ताई प्रकाश, कु. वैष्णवी माधव शिरबरतळ, कु. पार्वती सायबु नाईकवाड, राजेश संभाजी शिरबरतळ, यांचा सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सदस्या, सौ,अनुसयाबाई संभाजी शिरबरतळ, सौ, हारूबाई पांडुरंग आयतलवाड, प्रतिष्ठीत नागरिक सायबु संभाजी शिरबरतळ, श्री गंगाराम बाबाराव शिरबरतळ, नरहरी विठोबा शिरबरतळ, माधवराव लक्ष्मणराव इंगोले, श्रीमती लक्ष्मीबाई गणपत बरसमवाड मोगलाजी गणपत बरसमवाड सेवानिवृत्त पोलिस श्री गंगाराम मारोती घंटेवाड, श्री कालिदास वैजेनाथ शिरबरतळ, विनायक सटवाजी शिरबरतळ, प्रल्हाद नारायण शिरबरतळ, प्रल्हाद पांडुरंग बरसमवाड, विठ्ठल उमाजी आयतलवाड, श्री ज्ञानेश्वर केरबा शिरबरतळ,हे हजर होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठूमाऊली प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.विठ्ठल बरसमवाड यांनी केले, व सूत्रसंचालन विठ्ठल शिरबरतळ आणि आभार सौ. कल्याणी विठ्ठल यांनी मांडले.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी