स्वातंत्र्य समता बंधुत्व हा संदेश घेऊन निघालेल्या भारत जोडो यात्रेचे चौरंबा फाटा येथे लातूर, हिंगोली जिल्ह्यातील जनतेच्या वतीने अभूतपूर्व स्वागत - NNL

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे कलापथकांकडून सादरीकरण

माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या पुढाकारातून लातूर जिल्हयातील पदाधिकारी, कार्येकर्ते नागरिकांचा मोठया प्रमाणात सहभाग


लातूर |
काँग्रेस पक्षाचे नेते मा. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी पासून निघालेली भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र राज्यात देगलूर येथे आली होती. ही भारत जोडो यात्रा ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता हिंगोली जिल्ह्यातील हिवरे / चोरांबा फाटा येथे आली, या ठिकाणी उभारलेल्या भव्य प्रवेशद्वारावर लातूर व हिंगोली जिल्ह्यातील जनतेच्या वतीने येथे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख, आमदार धीरज देशमुख, आमदार श्रीमती प्रज्ञाताई सातव, वर्षा गायकवाड, अमर राजूरकर, माजी आमदार भाऊराव पाटील, यांच्यासह लातूर हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसने पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लातूर हिंगोलीसह जवळपासच्या जिल्ह्यातून मोठ्या संख्येने आलेल्या जनतेने या यात्रेचे उस्फूर्तपणे भव्य स्वागत केले. 

लातूर जिल्ह्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या पुढाकारातून सहभाग घेतला. या ठिकाणाहून चालत असतांना रस्त्याचा दुतर्फा गर्दीसह हजारों लोकांनी या यात्रेत सहभाग घेतला. संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विविध कलापतकांनी यावेळी सादरीकरण केले, ढोल- तश्या,लेझीम अशा विविध वाद्य प्रकारांच्या निनादाने तसेच राहुलजी गांधी यांच्या विजयाच्या घोषणामुळे काही काळ हा परिसर दणाणून गेला होता.

या यात्रेत युवा सेना प्रमुख माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे, प्रभारी एच.के.पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आदिवासी विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम, प्रणिती शिंदे, हूसेन दलवाई, सतेज पाटील, खासदार रजनी पाटील, खासदार कुमार केतकर, खासदार सुरेश धानोरकर, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, राजेश राठोड, बी.जी.कोळसे पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, भाई जगताप, सत्यजित तांबे, इम्रान प्रतापगडी, अमर राजूरकर, डी.पी.सावंत, विलास अवताडे, सिद्धार्थ हत्ती आंबिरे, आशिष दुवा, संपत कुमार, हुसेन दलवाई, मोहन जोशी, अतुल लोंढे, प्रमोद मोरे, देवानंद पवार, सचिन सावंत, डॉ. राजू वाघमारे आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची भावना वाढीस लागून देशाची एकात्मता अधिक मजबूत व्हावी म्हणून काँग्रेस पक्षाचे नेते खासदार मा. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रेस प्रारंभ झाला आहे, विविधतेतून एकता साधणाऱ्या या यात्रेच्या माध्यमातून राहुलजी गांधी देशभरातून ३७५० किलोमीटरचा पायी प्रवास करणार आहेत, दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यात या यात्रेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून लाखोच्या संख्येने विविधस्तरातील नागरिक यात्रेत सहभागी झाले. ७ नोव्हेंबर रोजी ही भारत जोडो यात्रा तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे प्रवेश केला आहे.

नांदेड जिल्ह्यातील चार दिवसाच्या प्रवासानंतर ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता सदरील यात्रा हिंगोली जिल्ह्यात हिवरे / चोरांबा फाटा येथे प्रवेश केला. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. लातूर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व जनतेने या ठिकाणी भारत जोडो यात्रेचे भव्य स्वागत केले. यानंतर पुढे भारत जोडो यात्रेत यात्रेत सहभाग घेतला.

हिंगोली जिल्ह्यात ही यात्रा चार दिवसाचा प्रवास करून पुढे वाशिम जिल्ह्यात ही यात्रा प्रवेश करेल, पुढे अकोला, बुलढाणा  जिल्ह्यातून मार्गक्रमण करीत  ही यात्रा मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे. महाराष्ट्रात नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यात ७  ते २० नोव्हेंबर अशा  १४ दिवस एकूण  ३८२ किलोमीटर ही यात्रा प्रवास करणार आहे. या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातील जनतेने जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहनही आमदार अमित देशमुख यांनी केले आहे. भारत जोडो यात्रेत लातूर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला, या यात्रेला लातूरसह राज्यातील कानाकोपऱ्यातील जनतेकडून मिळालेला प्रतिसाद अभूतपुर्व मिळाला आहे, असे माजी मंत्री आमदार देशमुख यांनी म्हटले आहे.

लातूर जिल्हयातून माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार त्रयबंक भिसे, अशोकराव पाटील निलंगेकर, किरण जाधव, दीपक सूळ, लक्ष्मण कांबळे, विजयकुमार साबदे, श्रीशैल उटगे, रवी काळे, विजय देशमुख, प्रविण सुर्यवंशी, समद पटेल, राजेश्वर निटरे, यशवंतराव पाटील, मोहन माने, गोरोबा लोखंडे, सिकंदर पटेल, प्रा.स्मिताताई खानापूरे, सपनाताई किसवे, विद्याताई पाटील, स्वाती जाधव, प्रिती भोसले, सुर्यशीला मोरे, सुर्यकांत कातळे, दिलीप देसाई, कैलास कांबळे, युनूस मोमीन, प्रमोद जाधव, अभय सांळूके, प्रविण पाटील, पृथ्वीराज शिरसाठ, आसिफ बागवान, इम्रान सय्यद, सचिन मस्के, राजकुमार जाधव, ज्ञानेश्वर सागावे, पंडित कावळे, फारूक शेख, रघुनाथ मदने, कैलास पाटील, गोटू यादव, राजू गवळी, वेंकटेश पुरी, प्रा. शिवाजीराव जवळगे, प्रा. माधव गादेकर, गोविंद बोराडे, बाळासाहेब बिडवे, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, दगडूअप्पा मिटकरी, देविदास बोरूळे पाटील, सुमित खंडागळे, हकीम शेख, गौरव काथवटे, सचिन बंडापल्ले, प्रताप पाटील, महादेव ढमाले, तबरेज तांबोळी, महेश काळे, हरिभाऊ गायकवाड, अभिजित इगे, सुनील पडिले,

प्रा.संजय ओहोळ, सुंदर पाटील कव्हेकर, गिरीश ब्याळे, असिफ बागवान, राम कोंबडे, इसरार सगरे, डॉ.बालाजी साळुंके, पप्पू देशमुख, अकबर माडजे, एकनाथ पाटील, विकास कांबळे, सुरेश गायकवाड, वर्षा मस्के, सुभाष घोडके, दगडूसाहेब पडिले, हकीम शेख, शरद देशमुख, मनोज देशमुख, रिहाना बासले, संजय पाटील, विजय टाकेकर, रफिक सय्यद, प्रा.एम.बी. पठाण, एम. पी. देशमुख, बिभीषण सांगवीकर, सुमन चव्हाण,कमल शहापुरे, यशपाल कांबळे, बानू शेख, हरून बासले, अविनाश बत्तेवार, करीम तांबोळी, सुभाष जाधव, अभिशेक पतंगे, सुलेखा कारेपूरकर, केशरबाई महापुरे, विवेक जगताप, राहुल डुमने, अब्दुल्ला शेख, नितीन कांबळे, राज क्षीरसागर, प्रा.सुधीर आनवले, आनंद वैरागे, आकाश मगर, पवन सोलंकर, विष्णू धायगुडे, बालाजी झिपरे, पवन कुमार गायकवाड, अंगद गायकवाड, फारुख शेख,श्रीकांत गर्जे, गणेश देशमुख, धनंजय शेळके, सत्यवान कांबळे, केतन सातपुते, कुमारअप्पा पारशेट्टी, जफर पटवेकर, शिवाजी कांबळे, गोविंद देशमुख, सुरेश धानुरे, प्रा.शिवाजी जवळगेकर, रघुनाथ शिंदे, गोविंद डुरे पाटील, ज्योती सिंघन, अनिता रसाळ, उषा चिकटे, शितल मोरे, संगीता पतंगे, सुधाताई कावळे, किरण बनसोडे, दयानंद कांबळे, महादेव सुर्यवंशी, कैलास माने, वैभव स्वामी,खाजा शेख, रामराव चामे, डॉ.सुधाताई कांबळे यांच्यासह लातूर जिल्हयातील लातूर शहर, लातूर तालुका, उदगीर, अहमदपूर, रेणापूर, औसा, निलंगा, जळकोट, चाकूर, शिरूर अंनतपाळ, देवणी, चाकूर तालुक्यासह जिल्हयातील विविध क्षेत्रातील नागरीक भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. या सर्वांनी भारत जोडो यात्रेत सहभागी होऊन काँग्रेस पक्षाचे नेते खासदार मा.श्री. राहुलजी गांधी यांच्या सोबत पदयात्रेत चालण्याचा ऐतिहासीक क्षण अनुभवला आहे.

काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रेचे हिंगोली जिल्ह्यातील चौरंबा फाटा येथे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख तसेच आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वात हजारोंच्या संख्येने आलेल्या जनतेने  लातूर / हिंगोली जिल्ह्याच्या वतीने  महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेल असे अभूतपूर्व स्वागत करून यात्रेत सर्वजण सहभागी झाले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी