‘स्वारातीम’ विद्यापीठाची सिनेट निवडणूक ; अध्यापक गटातून एकूण ६६ अर्ज वैद्य -NNL


नांदेड|
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी अध्यापक गटामधूनअधिसभेवर एकूण १० प्रतिनिधी निवडून द्यावयाचे आहेत.दि. ४ व ५ नोव्हेंबर रोजी अर्जाची छाननी करण्यात आली. १० जागेसाठी एकूण ७४ आले होते.त्यापैकी छाननीअंती ६६ अर्ज वैद्य तर ८ अर्ज अवैध ठरले आहेत. 

अध्यापक गटामध्ये एकूण २२६२ मतदार आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ चे कलम २८ (२) (r) नुसार अध्यापक गटामधूनअधिसभेसाठी एकूण १० सदस्यांची निवड करावयाची आहे. खुल्या गटामधून ५ प्रतिनिधी निवडावयाचे आहेत. त्यासाठी एकूण ३९अर्ज प्राप्त झाले होते. छाननीनंतर ५अर्ज अवैद्य ठरविण्यात आलेले आहेत. उर्वरित ३४ अर्ज वैद्य ठरले आहेत.अनुसूचित जाती अध्यापक गटामधून एकूण ११ अर्ज प्राप्त झाले होते. छाननीअंती सर्व ११ अर्ज वैद्य ठरले आहेत. अनुसूचित जमाती गटामधून ५ अर्ज प्राप्त झाले होते. 

छाननीअंती सर्व ५ ही अर्ज वैद्य ठरले आहेत. भटक्या व विमुक्त जाती गटामधून एकूण ६ अर्ज प्राप्त झाले होते. छाननीअंती१ अर्ज अवैद्य ठरला आहे.उर्वरित ५ अर्ज वैद्य ठरले आहेत. इतर मागासवर्ग गटामधून ६ अर्ज प्राप्त झालेले होते. छाननीअंती सर्व ६ अर्ज वैद्य ठरलेले आहेत. महिला गटामधून एकूण ७ अर्ज प्राप्त झाले होते. छाननीअंती २ अर्ज अवैद्य ठरलेले आहेत. उर्वरित ५ अर्ज वैद्य ठरले आहेत. असे एकूण ७४ अर्जांपैकी ६६ अर्ज वैद्य ठरले आहेत. 

 दि. १४ते १६ नोव्हेंबर दरम्यान सा.५:०० वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. दि. १७ नोव्हेंबरला पात्र उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. दि. २७नोव्हेंबर रोजी स. ८:०० ते ५:०० वा. दरम्यान निर्धारित केलेल्या मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. दि. २९ नोव्हेंबर रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे.असे विद्यापीठाचे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सर्जेराव शिंदे यांनी कळविले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी