राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.एकलारे चंद्रकांत यांची समन्वयक पदी निवड -NNL


मुखेड, रणजित जामखेडकर|
शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. चंद्रकांत एकलारे यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड यांच्याकडून विभागीय किंवा क्षेत्रिय समन्वयक पदी निवड करण्यात आली आहे .

विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांच्या स्वाक्षरीचे पत्र नुकतेच महाविद्यालयास प्राप्त झाले आहे . निवड झालेल्या समन्वयकाच्या नियंत्रित कार्यक्षेत्रातील महाविद्यालयात स्वामी विवेकानंद महाविद्यालय , मुक्रामाबाद , ग्रामीण महाविद्यालय , वसंतनगर , महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय , मुखेड आणि शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालय , मुखेड या महाविद्यालयांचा समावेश करण्यात आला आहे .       

सदरील निवड ही शैक्षणिक वर्ष २०२२- २३ करिता करण्यात आलेले आहे . या कालावधीत संबंधित महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा विभागांना वर्षभराच्या कालावधीत आणि विशेष शिबीरास भेटी देणे आवश्यक आहे . या माध्यमातून ग्रामीण भागातील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील समस्या आणि राष्ट्रीय पातळीवर स्वयंसेवकांचे बळकटीकरण करण्यासाठी मदत होणार आहे . राष्ट्रीय सेवा योजनेविषयी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात समाज आणि राष्ट्र मजबुतीसाठी विशेष मदत होणार आहे.         

त्यांच्या या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे , उपप्राचार्य प्रा.एस.बी.बळवंते ,रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. बी.एस.केंद्रे , अधिक्षक एस.के.सुर्यवंशी आणि प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन करून कौतुक केले जात आहे .


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी