खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश शेतकऱ्याला ४० हजाराची आर्थिक मदत -NNL


हिंगोली - औंढा (ना.)।
तालुक्यातील असोला (त.) येथील शेतकऱ्याचा बैल वीज पडून ठार झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मदत मिळण्यास विलंब होत असताना खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने शेतकऱ्याला ४० हजाराचा धनादेश देऊन मदत मिळवून देण्यात आली. 

वीज पडून ठार झालेल्या पशुधनांची नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येते, जिल्ह्यात यंदाच्या हंगामात अतिवृष्टी झाल्यामुळे वीज आणि वादळी वारे, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊन अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. वीज पडून पशुधनाची हानी झाल्यास राज्य शासनाच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आर्थिक मदत देण्यात येते. औंढा (ना)  तालुक्यातील असोला (त.) लाख येथील शेतकरी भानुदास कऱ्हाळे यांच्या बैलाचा वीज पडून मृत्यू झाला होता.

याबाबत त्यांनी औंढा तहसिल कार्यालयात अर्ज दाखल करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली होती. तक्रार दाखल होऊनही कोणीच दखल घेत नसल्याने शेतकरी कऱ्हाळे यांनी खासदार हेमंत पाटील यांच्याकडे आपले गाऱ्हाने मांडले यावर खासदार हेमंत पाटील यांनी तातडीने कारवाई करत औंढा तहसिल नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग, तहसिलदार यांना संपर्क करून सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनतर प्रकरण मार्गी लागले सर्व कागदपत्रांची पूर्तता आणि पंचनामा झाल्यानंतर अखेर खासदार हेमंत पाटील यांच्यामुळे शेतकन्याला न्याय मिळाला आणि ४० हजाराचा धनादेश थेट शेतकऱ्याला मिळवून देण्यात आला. अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीत शेतकरी हवालदिल असतांना शासनाच्या मदतीशिवाय पर्याय उरला नसून त्यातही शासन मदत मिळण्यास विलंब होत होता. 

याकामी औंढा नागनाथचे तहसिलदार कृष्णा कानगुले, खासदार हेमंत पाटील यांचे कळमनुरी औंढा विधानसभा क्षेत्राचे जनसंपर्क अधिकारी अमोल बुद्रुक, लिपिक पाथरकर,  मा.सरपंच शिवाजीराव कऱ्हाळे, पोलीस पाटील तुकाराम दळवे, रावसाहेब कऱ्हाळे पांडुरंग  कऱ्हाळे , विशाल कऱ्हाळे, विजय कऱ्हाळे, भानुदास कऱ्हाळे, यांनी सहकार्य केले. खासदार हेमंत पाटील यांच्यामुळेच मला नुकसान भरपाई मिळू शकली याबाबत शेतकरी भानुदास कऱ्हाळे. यांनी आभार मानून ऋण व्यक्त केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी