महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाच्या अध्यक्षपदी अशोक स्वामी यांची फेरनिवड -NNL


नांदेड।
महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाच्या अध्यक्षपदी अशोक स्वामी यांची फेरनिवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश भागवत यांच्या अध्यक्षतेखाली  ( दि. १७ ) गुरुवारी झालेल्या बैठकीत ही निवड झाली. कोल्हापूर जिल्ह्यातून सुनील तोडकर, दिलीप मुथा, विश्वनाथ मेटे, अशोक माने, किसनराव कुराडे यांना संचालकपदी संधी मिळाली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाच्या नुतन संचालक मंडळाची बैठक संस्थेच्या मुंबई येथील कार्यालयात पार पडली. स्वामी यांनी अध्यक्षपदाच्या काळात वस्त्रोद्योगासह सूत गिरण्यांना भेडसावणार्‍या समस्या, निर्माण होणार्‍या अडचणी या संदर्भात शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करुन प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. मागील अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी केलेल्या कामांमुळे राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या अध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

अन्य संचालकांमध्ये पृथ्वीराज देशमुख, रणजित देशमुख, बाबाराव पाटील, राजशेखर शिवदारे, राहुल महाडीक, विरेंद्र गजभिये, सविता सोनखेडकर, रोहिणी खडसे-खेवलकर, चंद्रकांत बडवे यांचा समावेश आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी