‘लव्ह-जिहाद्यांचा’ खुनी खेळ थांबविण्यासाठी राज्यात कठोर कायदा करून आंतरधर्मीय विवाह लव्ह जिहादावर बंदी घाला - नांदेडच्या ‘रणरागिणी’ची मागणी -NNL


नांदेड, अनिल मादसवार|
दिल्ली येथे कु.श्रद्धा हिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे अमिश दाखउन लव्ह इनमध्ये राहणाऱ्या अफ्ताबने लग्नाची मागणी करताच अत्यंत क्रूरतेने हत्या करून तिच्या  शरीराचे ३५ तुकडे करून घरातील एका फ्रिजमध्ये ठेऊन विल्हेवाट लावणाऱ्या क्रूरकर्मी आफताबला  कठोर शासन व्हावे यासाठी कठोर कायदा करावा. ‘लव्ह-जिहाद्यांचा’ खुनी खेळ थांबविण्यासाठी राज्यात आंतरधर्मीय विवाह लव्ह जिहादावर बंदी घालावी अशी मागणी विश्व् हिंदू परिषद नांदेडच्या ‘रणरागिणीनी’ एका निवेदनाद्वारे करून दिल्ली पोलिसांनी कु.श्रद्धाचा खून करणाऱ्या नराधमास अटक केल्याबाबद्दल अभिनंदन केले आहे.

मूळ मुंबईची असलेली हिंदू तरुणी श्रद्धा वालकर हिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून ‘लिव इन’मध्ये रहाणार्‍या आणि लग्नाविषयी विचारणा केल्यावर मारहाण करत तिची निघृणपणे हत्या करणारा लव्ह-जिहादी आफताब हा क्रूर, नराधम आहे. हिंदु मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन करून त्यांच्याशी बळजबरीने ‘निकाह’ करणे, याला नकार दिल्यास बलात्कार करणे, ब्लॅकमेल करणे, हत्या करणे आदी गंभीर घातां दिवसनेदिवस वाढत चालल्या आहेत. या घटना वाढविण्यास कट्टरतावादी यांचे समर्थन असल्याचे निदर्शनास येत आहे. 


दि.१३ नोव्हेंबर रोजी देखील संभाजीनगर येथे शिकवणीचा वर्ग संपल्यानंतर संबंधित मुलगी आपल्या घरी जाण्यासाठी एका रिक्षात बसली. काही अंतर दूर गेल्यानंतर रिक्षा चालक सय्यद अकबर सय्यद हमीद याने संबंधित अल्पवयीन मुलीची छेड काढली. यामुळे घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने स्वतःला वाचविण्यासाठी चालत्या रिक्षातून उडी मारली आहे. या दुर्दैवी घटनेत पीडित मुलीच्या डोक्याला दुखापत झाली असून, सध्या ती आयसीयू मध्ये भरती आहे. आपला कायदा कमकुवत असल्याने हे निधर्मी गैरफायदा उचलत आहेत. अश्या घटना घडल्यानंतर सदरील गुन्हेगारास अटक होते आणि काही महिन्याने सुटला कि पुन्हा तोच गुन्हा करतो. 

यासाठी ज्यांनी जो गुन्हा केला त्यास तीच शिक्षा व्हावी असा कायद्यात बदल करावा. तरच हे लव्ह-जिहादचे खुनी खेळ थांबतील असेही जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत राष्ट्रपती महोदय याना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रति त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे पाठविले आहेत. यावर योगिता बाहेती, मंजुषा देशपांडे, पूजा बिसेन, मालाताई शर्मा, संजीवनी देशपांडे, सविता शर्मा, संध्या झंपरवार, रुपाली परमार, पूजा तेहरा, जया कमळवार, मंगल वर्मा, वैष्णवी शर्मा, संतोषी तिडके, शकुंतला वाडे, लक्ष्मी पुंदरोड, अनु वैष्णवाडे, आदींसह विश्व् हिंदू परिषद, मातृ शक्ती,दुर्गा वाहिनी संघटनेच्या अनेक रणरागिणीच्या स्वाक्षऱ्या आहेत.   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी