श्री दत्त केशवगिरी महाराज देवस्थान देळुब खु. येथे सांस्कृतिक सभागृहासाठी दहा लाखांचा निधी : खा.प्रतापराव पाटील चिखलीकर -NNL


नांदेड|
अर्धापूर तालुक्यातील येथील श्री दत्त केशवगिरी महाराज संस्थांच्या सांस्कृतिक सभागृह उभारणीसाठी खासदार निधीतून दहा लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नुकतीच केली आहे. श्री अखंड हरिनाम सप्ताह दत्तनाम चातुर्मास सांगता आणि श्री दत्त महापुराण कथा सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कीर्तन ज्ञानामृत सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य धर्मराज देशमुख, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव अनिल पाटील बोरगावकर, भाजपा दक्षिण विधानसभा अध्यक्ष बालाजी पाटील पुणेगावकर, भाजपा तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी, सुधाकरराव देशमुख, बाबुराव हेंद्रे, डाॅ.लक्ष्मणराव इंगोले, युवा मोर्चाचे कृष्णा पाटील इंगोले, जेठन पाटील मुळे, किसान मोर्चाचे देविदास पाटील कल्याणकर, बालाजी कदम, विश्वनाथ खुळे, शिवाजी साखरे, गोविंद कदम, शक्ती केंद्र प्रमुख माधव डाकोरे, बुथ प्रमुख सुरेश पाटील वळसे, बालाजी वळसे, शेतकरी नेते किशनराव कदम, संजय कदम, अजिंक्य कदम, सुनिल कदम, तिरुपती डाखोरे, किशनराव कदम देगांवकर, डाॅ. गणेश मांजरे, देविदास पताळे, मोतीराम डाखोरे, रमेश कदम, उध्दव मांजरे, किशन मांजरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.


अर्धापूर तालुक्यातील देळुब खु. येथील श्री दत्त केशवगिरी महाराज संस्थांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह दत्तनाम चातुर्मास सांगता आणि श्रीदत्त महापुराण कथा सोहळ्यानिमित्त भव्य कीर्तनात ज्ञानअमृत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 12 नोव्हेंबर 2022 रोजी पार पडलेल्या या धार्मिक सोहळ्याच्या उद्घाटनासाठी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित भाविक भक्तांशी संवाद साधताना खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी देशातील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक परिस्थितीसाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशात खऱ्या अर्थाने संस्कृती जतन केली आहे. प्रभू रामचंद्राचे मंदिर, उज्जैन येथील महादेव मूर्ती, गुजरात मधील स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी चा पुतळा उभा केला आहे. 

जगातील महासत्ताधारी राष्ट्र म्हणून आपले राष्ट्र उभे राहिले आहे. त्यामुळे देशातील कोणत्याही नागरिकाला कोणाच्या भीतीने आणि दबावाला घाबरण्याचे कारण नाही. केंद्र सरकार आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. आपल्या संरक्षणासाठी आपल्या रक्षणासाठी आणि आपल्या समृद्धीसाठीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार काम करेल असा विश्वासही खा.चिखलीकर यांनी दिला. त्याचवेळी श्री दत्त केशवगिरी महाराज संस्थान देळुब खु. ता.अर्धापूर येथील सांस्कृतिक सभागृह उभारणीसाठी 10 लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी