जिल्हा परिषद शाळा कौठा(जुना) येथे शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न -NNL


नविन नांदेड।
जि.प.प्रा.शाळा कोठा जुना येथे शाळा स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन  सामाजिक कार्यकर्ते तथा शालेय समिती शिक्षक तज्ञ सदस्य निळकंठ काळे यांच्या हस्ते 12 नोव्हेंबर रोजी करण्यात आले यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष मुख्याध्यापक नवहारे व सर्व शिक्षकवृंद, यांच्यी ऊपसिथीती होती.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठा येथे शाळा स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यात 5वी ते 7 वी विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला होता. शाळेतील विषय शिक्षक चंद्रकांत पवार ,यांच्या अथक परिश्रमाने विद्यार्थीनी  पवन चकी, चंद्रयान, सौर ऊर्जा कुलर, सौर ऊर्जा वर वाटर फिल्टर, पाण्याचे जल चक्र, यासह 20  प्रयोग सादर केले,

वरीष्ठ शिक्षक पत्रे,शैबलवार, बकवाड, सौ.कळसकर, सौ.पवळे, सौ. महाजन, सौ.खामीतकर,पटणे, यांच्या सहकार्याने हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी झाले. शालेय समितीचे अध्यक्ष  प्रल्हाद काळे, उपाध्यक्ष बालाजी गोरे,पिंटु ऊर्फ मारोती गोरे, यांचासह शालेय समितीचे पदाधिकारी यांनी विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी