बिलोलीच्या ऐतिहासिक मशिद परिसरातील अतिक्रमण काढा - NNL

नागरिकांनी केली पुरातत्व विभागाकडे तक्रार


बिलोली/नांदेड।
येथे निजामकालीन ऐतिहासिक जामा मशिद व दर्गा असून या वस्तू लगत असलेल्या ईनामी जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. ते लवकरात लवकर काढण्यात यावे अन्यथा आमरण उपोषण करण्याचा ईशारा पुरातत्व कार्यालय औरंगाबाद यांना एका निवेदनाद्वारे येथील तक्रादारांच्या वतीने देण्यात आला आहे. 

वक्फ संस्था मजिद ए कला टोंब नवाब सरफराज खान शहिद झुंजागन नकारखाना कब्रस्थान या ऐतिहासिक वास्तूची देखभाल, साफसफाई,स्वच्छता व पिण्यासाठी,वुजू करण्यासाठी पाण्याची व्यवस्था आदी सोयी सुविधा व्यवस्थीत होत नसल्यामुळे मुसल्लीयानला याचा ञास होत आहे.काही वर्षापूर्वी या मशिदीचे काही कामे करण्यात आली.तर अजूनही कामे अर्धवट स्वरुपाचे आहे.


यात मशिदीचे  मिनार,झुंबर,जाळी,दगडी साखळी,फरशी व ईतर वास्तुकला तात्काळ पुर्ण करण्यात यावे व येथील पुरातन असलेले खनिज संपत्ती व वास्तु कला असलेले नकाशे,सोन्याच्या धातुने स्वर्ण अक्षरात लिहीलेली विरासत,ऐतिहासिक लिखाण व ईतर साहित्य धुळखात असुन याची सुध्दा देखरेख आपल्याच कार्यालयामार्फत करण्यात यावी. परिसरातील प्रागंणात असलेले कुतूबघराची (वाचनालय) साफ सफाई करुन पर्यटक,श्रध्दालु,मुसल्लीयान यांच्यासाठी खुले करण्यात यावे.


प्राचीन स्मारके,पुरातत्व स्थळे व अवशेष अधिनियम १९५८ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन इ.स.१९५८ अधिनियमानुसार सरंक्षीत स्मारकापासुनचे १०० मि.क्षेत्र हे सुरक्षित क्षेत्र म्हणुन आणि ३०० मिटरचे क्षेत्र वि.नियमीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे.या परिसरात उपरोक्त कायदयानुसार कोणतेही तात्पुरते किंवा कायमचे लहान किंवा मोठे तात्पुरते बांधकाम करता येत नाही.तरी पण या नियमाचे कायद्याचे उल्लघंन करुन बेकायदेशिरत्या अनाधिकृतपणे या परिसरात सध्या शौकत फक्शंन हॉल (मंगल कार्यालय),वाॕटर फिल्टर प्लँन्ट,सिंमेट चे गोडाऊन,दुकाने ( हौजे ए खास विहरीवर ) थाटण्यात आले आहे.

वादग्रस्त तात्पुरते मुत्तवली मिर्झा शौकतबेग महेमुद बेग यांनी  ऊर्ससाठी राखीव असलेल्या  क्रिंडागणावर बांधलेले मंगल कार्यालय पाडून सदरिल मैदान हे सर्वांसाठी तात्काळ खुले करण्याची मागणी निवेदनात नमुद करण्यात आली.सदरिल निवेदनावर एजाज फारुखी, शेख वाजिद शेख अब्दुल्ला,अब्दुल रशीद अब्दुल खय्युम,फाते पटेल, जमील अहेमद खान,सादीख पटेल,शेख सलीम शेख हुसेन,रफीख ईनामदार,गौस अल्लाबक्ष,कौसर बावजीर,शेख मुस्तफा,सय्यद मैनोद्दीन,शेख माजिद,महंमद खाजा पटेल,ताहेर कुरेशी,मोईजा खान महेमूद खान,मेराज पटेल,शकील पटेल,ईरफान पटेल,मन्सुर खान आदींची नावे व स्वाक्ष-या आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी