परशुराम कुंड यात्रेचे गुरुवारी आगमन; यात्रेचे होणार शाही स्वागत -NNL


नांदेड|
अरुणाचल प्रदेशातील लोहित जिल्'ात भगवान परशुराम कुंड आहे. या कुंड परिसरात केंद्र सरकारतर्फे उभारण्यात येणाऱ्या भगवान परशुराम यांच्या ५१ फुटी मूर्तीच्या अनुषंगाने बहुभाषिक ब्राह्मण समाज व अन्य संघटनांतर्फे पोहोचणे व या माहिती देण्यासाठी विप्र फाउंडेशनतर्फे परशुराम कुंड यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा उद्या, गुरुवारी, १७ नोव्हेंबर रोजी नांदेड शहरात येत आहे. या यात्रेचे सर्व समाजाने शाही स्वागत करावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

गुरुवारी दुपारी ३ वाजता शहरातील जुना मोंढा भागात यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. यानिमित्त मोंढ्यात भव्य सांस्कृतिक कार्यक्रम, यात्रेचा उद्देश विषद करणे, यात्रेकरुंचे स्वागत असा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर ही यात्रा दुचाकी रॅलीने शहरातून मार्गक्रमण करणार आहे. ही यात्रा बालाजी मंदिर, गुरुद्वारा चौक, महावीर चौक,हनुमान पेठ, मुथा चौक, कलामंदिर,शिवाजीनगर, आयटीआय चौक, शासकीय विश्रामगृह चौक, गणेशनगर, पावडेवाडी नाका मार्गे काबरानगरमधील भगवान परशुराम चौक येथे जाणार आहे. 

या यात्रेच्या मार्गावर बहुभाषिक ब्रा'मण समाज आणि अन्य नागरिकांनीही पुष्पवृष्टी, आरती करुन स्वागत करावे असे आवाहन विप्र फाउंडेशन नांदेडने केले आहे. यात्रेच्या यशस्वीतेसाठी राजस्थानी महिला संघटन, अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघ, ब्राह्मण महासंघ, बीबीएन फाउंडेशन, अ.भा.ब्राह्मण महासंघ, पूर्णवाद परिवार,आर्य चाणक्य सेना, मारवाडी युवा मंच, राजस्थानी महिला संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी