"नानक - साई" फाऊंडेशनला पंजाबचा 'मानव सेवा पुरस्कार' -NNL


नांदेड।
येथील सामाजिक आध्यत्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत पंजाब आणि महाराष्ट्र राज्यात बंधुभाव जगवण्यात यशस्वी ठरत असलेल्या "नानक - साई" फाऊंडेशनला पंजाबच्या सहारा क्लबचा 'मानव सेवा पुरस्कार' नुकताच बटाला येथे समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला. पंजाब मध्ये सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या सहारा क्लब या संस्थेचच्या वतीने हा पुरस्कार जाहीर झाला होता.

 बटाला येथे आयोजित एका शानदार सोहळ्यात बटालाचे महापौर सरदार सुखदीपसिंघ तेजा यांच्या हस्ते या पुरस्काराच वितरण करण्यात आले. नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख तथा संत नामदेव घुमान यात्रेचे मुख्य संयोजक पंढरीनाथ बोकारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रोख 21 हजार रुपये, मानचिन्ह असे या पुरस्काराच स्वरूप आहे. नानक साई फाऊंडेशन दरवर्षी संत नामदेव महाराज यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने श्री हजूर साहिब (नांदेड)  ते अमृतसर पंजाब अशी घुमानयात्रा आयोजित करते. 


पंजाब व महाराष्ट्र राज्यात नानकसाई फाऊंडेशन घुमान यात्रेच्या माध्यमातून बंधुभाव व सांस्कृतिक देवाणघेवाण करण्यात ही चळवळ यशस्वी ठरली आहे. नानक साई फाऊंडेशन च्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे. यावेळी प्रा. सरदार निर्मलसिंघ रणधवा, सरदार जोगिंदरसिंघ मास्टर, सरदार मणबीरसिंघ रणधवा, सरदार रूपींदरसिंघ शामपुरा, सरदार सुरेंद्रसिंघ सोडी, सौ प्रफुल्लाताई बोकारे, श्रेयसकुमार बोकारे,बळीराम पवार, सौ तेजश्री पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. 2 ते 12 नोव्हेंबर 2022 कालावधीत घुमान यात्रा आयोजित करण्यात आली होती, या दरम्यान वेळी हा पुरस्कार बटाला (पंजाब) येथे प्रदान करण्यात आला.  

नानक साई फाऊंडेशन'ला यापूर्वी पानिपतच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज वेल्फेअर संचाचा पानिपत शौर्य तीर्थ पुरस्कार,करकाळा येथील ग्रामीण साहित्य संमेलनाचा लोकसंवाद पुरस्कार प्राप्त झाला आहे. नानक साई फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने घुमान यात्रेसह विविध सामाजिक, आध्यत्मिक उपक्रम राबविण्यात येतात. सर्वश्री माधवराव पटणे, सुभाष बल्लेवार, जी.नागय्या,तुलसीदास भुसेवार, हरिदास भट्टड,संभाजीराव धुळगंडे, मंगलाताई निमकर सतीश देशमुख तरोडेकर, विनायक पाथरकर, सरदार राणा रणबीरसिंघ पंजाब हॉटेलवले, प्रा. राजेश मुखेडकर, डॉ गजानन देवकर,गंगाधर पांचाळ,दिलीप अंगुलवार, जयप्रकाश नागला, बालाजी ढगे, पुंडलिक बेलकर, धनंजय उमरीकर, गोपाळ पेंडकर,,प्राचार्य मोतिभाऊ केंद्रे, बळीराम सुकरे, महाजन उप्पलवाड, विश्वम्बरराव भोसीकर, प्रल्हाद भालेराव, दीपकसिंह गौर,मधुकर कारेगावकर, विलास पडवळ, तुकाराम कोटूरवार,चरणसिंग पवार,दत्ता डांगे,संजय कदम, दीपक मठपती, शिवहारी तोडकरी,चंद्रकांत पवार, रामप्रसाद गटाणी, जयंत दंडवते,दिलिप जाधव, चंद्रकांत शाहसने,ऍड विजय भोपी, राजेंद्र ठाकूर, प्रा ललिता शिंदे,जनार्धन पिन्नलवार यांनी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी