मातंग समाज समन्वय सल्लागारपदी बा.रा.वाघमारे यांची निवड -NNL


उस्माननगर।
उस्माननगर येथील सामाजीक कार्यकर्ते तथा अण्णाभाऊ साठे पिपल्स फोर्स संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बा.रा. वाघमारे यांची मातंग समाज समन्वय समीती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्य सल्लागार पदी निवड करण्यात आली आहे.

 बा. रा. वाघमारे यांच्या सामाजिक कार्याची  जाणीव ठेवून  फुले,शाहु, आंबेडकर ,अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून व समाजा विषयी असलेली तळमळीची दखल घेवून त्यांना नियुक्तीचे पत्र संस्थापक अध्यक्ष संजय बबनराव बोदडे, महासचिव विजय सोनोने यांच्या स्वक्षरीने देण्यात आले.

बा.रा.वाघमारे यांनी संपादक सा.दावेदार मधून समाजा विषयी जनजागृती केली.विविध जयंती मधून म. बसवेश्वर, म.फुले,शाहु, आंबेडकर,अण्णा भाऊ साठे यांचे विचार समाजासमोर मांडून समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी असलेली तळमळीची दखल घेऊन त्यांना मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या सल्लागार म्हणून  निवडीमुळे सर्व समाजातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. 

तसेच त्याच्या निवडीचे पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे, उपाध्यक्ष माणिक भिसे, सचिव प्रदीप देशमुख, लक्ष्मण कांबळे, प्रा.विजय भिसे, शेख मोईन लाठकर, , गोपाळ भिसे, प्रा.नागन भिसे ,  तेजस भिसे ,राजू वाघमारे , दिलीप वाघमारे , बालाजी वाघमारे , गंगाप्रसाद वाघमारे ,रवि भिसे ,शरद वाघमारे ,यांच्यासह अनेक मित्रांनी अभिनंदन केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी