जिवंत ट्रस्टीना मृत जाहीर करून ट्रस्ट वर हक्क सांगायचा प्रयत्न -NNL

पुणे पोलिसांना न्यायालयाचे तपास करण्याचे आदेश.


पुणे|
जिवंत ट्रस्टीना मृत जाहीर करून ट्रस्ट वर हक्क सांगायचा प्रयत्न करण्याच्या प्रकरणात तपास करण्याचे आदेश न्यायालयाने    पुणे पोलिसांना  दिले आहेत.

पुणे स्टेशन परिसरातील एका धार्मिक ट्रस्टचे ट्रस्टी जिवंत असतांना ते मरण पावले आहेत असे शपथपत्र पुण्यात तयार करून काही आरोपीनी औरंगाबाद येथील वक्फ कार्यालयात सादर केले, त्या संदर्भात पुणे स्टेशन येथील पोलीस चौकीत सदर ट्रस्टिंनी तक्रार दाखल केली होती, त्यावर पोलिसांनी गुन्हा घडल्याचे दिसत असले तरी कागदपत्रे औरंगाबाद येथे सादर झालेली असल्याने औरंगाबाद येथे जाऊन तक्रार दाखल करण्याचे पत्र तक्रारदार सिराज शेख यांना दिले. 

त्यावर त्यांनी ऍड समीर शेख यांच्या मार्फत पुणे येथील प्रथमवर्ग न्यायाधीश यांच्याकडे दाद मागितली .न्यायालयाने बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना या प्रकरणात तपास करण्याचे आदेश दिले आहेत.जिवंत माणसाला मृत दाखवल्याने परिसरात खळबळ  उडाली आहे आणि तो एक  चर्चेचा विषय झाला आहे.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी