सायबर हल्ल्यांपासून सुरक्षिततेसाठी सेक्यूराइटकडून 'ईपीएस ८.०' सादर -NNL


मुंबई|
सेक्यूराइट या आघाडीच्या जागतिक एंटरप्राइज सायबर सिक्युरिटी सोल्यूशन्स पुरवठादार कंपनीने आज त्यांचे प्रमुख सोल्यूशन एण्डपॉइण्ट सिक्युरिटीच्या प्रगत व्हर्जनचे अनावरण केले. पहिल्यांदाच एण्डपॉइण्ट हंटिंग टेक्नोलॉजीसह पॉवर-पॅक वैशिष्ट्ये असलेले

ईपीएस ८.० अत्याधुनिक सायबर हल्ल्यांपासून सर्व कनेक्टेड डिवाईसेस सुरक्षित करण्यासाठी सक्रियपणे डिझाइन केलेले आहे. या व्हर्जनसह सेक्यूराइटने एसएमई विभागासाठी मोठ्या संख्येने एण्डपॉइण्ट्स एकसंधीपणे व्यवस्थापित करण्यासाठी या सोल्यूशनचे प्रमाण देखील सुधारले आहे, त्यामुळे ग्राहकांना उपयोजन उपस्थिती आणि संबंधित देखभाल कार्य कमी करण्यास मदत होते. हे व्हर्जन आता लिनक्ससाठी (Linux) रिअल-टाइम संरक्षण प्रदान करते आणि नियामक, ऑडिटर व ग्राहकांसाठी सुधारित अनुपालन अहवाल देते. 

या नवीन व्हर्जनमध्ये एण्डपॉइण्ट थ्रेट हंटिंग तंत्रज्ञान आहे, जे वापरकर्त्यांना नियामक, ऑडिटर्स किंवा त्यांच्या अंतिम ग्राहकांकडून डिलिट व क्वॉरंटाइन अशा अनेक कृती करताना पुरवल्या जाणाऱ्या अपायकारक आयओसीसाठी (इंडिकेटर्स ऑफ कॉम्प्रोमाइज) त्यांचे एण्डपॉइण्ट्स सक्रियपणे स्कॅन करण्यास मदत करेल. स्कॅन्स ऑन-डिमांड किंवा अद्वितीय फाइल प्रॉपर्टी, फाइल हॅशेससह रिकरिंग शेड्यूलवर करता येऊ शकतात.

क्विक हिल येथील संयुक्त व्यवस्थापकीय संचालक व प्रमुख तंत्रज्ञान अधिकारी डॉ. संजय काटकर म्हणाले, "महामारीनंतर सायबरहल्ले आणि त्यांच्या अत्याधुनिक पद्धतींच्या वापराच्या प्रमाणामध्ये अनपेक्षित वाढ झाली आहे; यामुळे व्यवसायांनी या सर्व जोखीमांचे निर्मूलन करण्यासाठी भविष्यासाठी सुसज्ज तंत्रज्ञानांचा अवलंब करणे अधिक महत्त्वाचे बनले आहे. सेक्यूराइटमध्ये आमच्या सर्वात अभिनव विचारवंतांनी एकत्र येऊन रिअल-टाइममध्ये एण्ड पॉइण्ट थ्रेट हंटिंग तंत्रज्ञानाने युक्त ईपीएस ८.०ची निर्मिती केली आहे, ज्यामध्ये आमच्या ग्राहकांना अहोरात्र आणि भौगोलिक क्षेत्रांमध्ये सु‍रक्षित ठेवण्यासाठी इतर अनेक सर्वोत्तम वैशिष्ट्यांचा समावेश आहे, ज्यामुळे ते त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असलेले कार्य करण्यावर लक्ष केंद्रित करू शकतील.’’

ईपीएस ८.० मध्ये सानुकूल सुरक्षितता देण्यासोबत कंपन्यांना केंद्रीकृत व्यवस्थापन व नियंत्रण देण्यासाठी एण्डपॉइण्ट थ्रेट हंटिंग व्यतिरिक्त अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्ये आहेत, जसे अॅडवान्स्ड डिवाईस कंट्रोल, डेटा लॉस प्रीव्हेंशन, वलनेराबिलिटी स्कॅन, पॅच मॅनेजमेंट, वेब फिल्टरिंग, अॅसेट मॅनेजमेंट. डिटेक्शन स्कॅन्स पासून अॅसेट मॅनेजमेंटपर्यंत ईपीएस ८.० मध्ये सायबरहल्ल्यांना ब्लॉक करण्यासाठी अॅण्टी-रॅन्समवेअर व बीहेविरल डिटेक्शन सिस्टिम्स अशा प्रगत तंत्रज्ञानांचा समावेश आहे, ज्यामुळे रिअल-टाइममध्ये बहुस्तरीय संरक्षणाची खात्री मिळते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी