युवा पिढी घडविण्याचे काम करणारा देशाचा खरा आधारस्तंभ - ह.भ.प.चंद्रकांत महाराज लाठकर -NNL


उस्माननगर,माणिक भिसे।
देशाची भावी युवा पिढी घडविण्याचे पवित्र काम करणारे पत्रकार व शिक्षक हा देशाचा खरा आधारस्तंभ आहे., बदलते तंत्रज्ञान आत्मसात करून शिक्षकांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य करावे असे प्रतिपादन किर्तनकार विनोदाचार्य ह.भ.प.चंद्रकांत महाराज लाटकर यांनी केले.

उस्माननगर येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहात उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन व पं.स.कंधार येथील सेवानिवृत्त शिक्षणविस्तार अधिकारी राजेश्वर पांडे यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किर्तनकार ह.भ.प.चंद्रकांत महाराज लाटकर हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षणविस्तार अधिकारी राजेश्वर पांडे, दिलीपराव देशपांडे (. सावजी आर्बन बॅंक संचालक   ) सेवानिवृत्त ग्रामसेवक नागोराव पाटील घोरबांड, आदर्श सेवानिवृत्त शिक्षक विश्वासराव लोखंडे यांची उपस्थिती होती.

यावेळी प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.त्यानंतर पाहुण्याचा स्वागत करण्यात आले.पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष गणेश लोखंडे व सेवानिवृत्त शिक्षणविस्तार अधिकारी राजेश्वर पांडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना ह.भ.प.चंद्रकांत महाराज लाटकर म्हणाले की , समाजात घडतय ते सांगतेय त्याला पत्रकार म्हणतात.तर समाजातील मुलांना घडविण्यासाठी परिश्रम घेऊन घडवितो त्याला शिक्षक म्हणतात.एक लिहिणारा तर दुसरा शिकवणार आपल्या समाजात आदर्श व्यक्तीमत्व आहेत.

सेवेची निवृत्ती ही लाक्षणिक स्वरूपाचा असतो ,मणुष्य जोपर्यंत जीवंत आहे तोपर्यंत त्याची सेवा चालू असते.सेवा कोणाचीही बंद पडत नाही.प्रत्येक माणसाला चार लोकांची गरज असते. शिकविण्यासाठी शिक्षक , सांभाळण्यासाठी रक्षक , पोषणासाठी पोषक, सेवा करण्यासाठी सेवक लागतो हे चार लोक असल्याशिवाय माणसांचे जीवन चालत नसल्याचे सांगितले.पुढे बोलताना म्हणाले की पत्रकारिता ही ग्रामीण भागातील निर्भिड असते.विकासासाठी सर्वांसोबत राहून लिखाण करणारे पत्रकार या भागात उदयास आली पाहिजे असे मत व्यक्त केले . 

पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे यांना फोन करून व प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे लोखंडे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाला संभाजी कांबळे,दौलत पांडागळे, सुनील भुरे , संतोष कराळे ,शुभम डांगे,अमजद पठाण, विठ्ठल ताटे पाटील, प्रदीप देशमुख,लक्ष्मण कांबळे, माणिक भिसे, सुर्यकांत मालीपाटील, यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.प्रदीप देशमुख यांनी केले,तर आभार प्रदर्शन सुर्यकांत मालीपाटील यांनी केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी