निमाच्या अध्यक्षपदी डॉ. संदीप पचलिंग तर सचिवपदी डॉ. संजय देलमाडे यांची निवड -NNL


मालेगाव/ नांदेड|
निमा संघटनेच्या नांदेड जिल्हा शाखेची द्विवार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच निमा भवन येथे नांदेड निमा अध्यक्ष डॉ. अविनाश वडजे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत 2020 -2022 चे सर्व अहवाल एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी निमाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी डॉ. संदीप पचलिंग तर सचिवपदी डॉ. संजय देलमाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 

2020 - 22 मध्ये निमासाठी उत्कृष्ठ कार्य करणार्‍या डॉ. रामभाऊ तायडे व डॉ सम्राज्ञी पाध्ये यांना डॉ. सुरेश गादेवार प्रायोजित बेस्ट एक्टिविस्ट नांदेड निमा अवार्ड अध्यक्ष डॉ. अविनाश वडजे व वुमेन्स फोरम अध्यक्ष डॉ. करुणा जमदाडे मॅडम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यानंतर 2022 24 च्या वर्षासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी डॉ. संदीप पचलिंग, सचिवपदी डॉ. संजय देलमाडे, कोषाध्यक्षपदी डॉ. दिलीप शिवाल यांची निवड करण्यात आली.

या सभेत निवडण्यात आलेली नवीन कार्यकारणी पुढील प्रमाणे उपाध्यक्ष - डॉ. जवादुल्हा खान, डॉ. किशोर लोहिया, डॉ. राहुल माका, डॉ. विजय मसलगेकर, संघटक -डॉ. मुकेश टाक, सहसचिव डॉ. राधेश्याम दाड, डॉ. सूर्यप्रकाश बोखारे, डॉ. संजय कोल्हे, डॉ. सुनील पिंपळे, उपसचिव डॉ. श्रीकांत पटवेकर, डॉ. विलास धर्माधिकारी, डॉ. विकास वाटोरे, डॉ. इरबा तोटेवाड आदींची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक अधिकारी म्हणून डॉ.एस. एम. बंग व डॉ. विजयकुमार सुर्वे यांनी काम पाहिले. व्यासपीठावर निमाचे केंद्रीय सहसचिव डॉ. संजय करवा महाराष्ट्र निमा सहसचिव डॉ. श्रीराम कल्याणकर विभागीय सचिव डॉ. नरेंद्र कसबे अध्यक्ष डॉ. संदीप पचलिंग माजी अध्यक्ष डॉ. अविनाश वडजे, डॉ डी. लक्ष्मण, डॉ. संजय भक्कड, डॉ. कैलाश भाडेकर वुमेन्स फोरम अध्यक्षा डॉ. करुणा जमदाडे,  सचिव डॉ. माया पवार, कोषाध्यक्षा डॉ. स्वरूपा जाधव व कार्यकारणी सदस्य व बहुसंख्य निमा उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय देलमाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.सूर्यप्रकाश बोखारे यांनी केले.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी