दाताळा येथील जि. प.शाळेतील माजी विद्यार्थ्याकडून शाळा सुधारण्याचा घेतला पुढाकार -NNL

विविध शालेय साहित्याची भेट  


उस्माननगर, माणिक भिसे|
उस्माननगर येथून जवळच असलेल्या कंधार तालुक्यातील दाताळा जि.प.शाळेला  सुधारण्याचा निर्णय या शाळेच्या इ.स.१९९०-९५ मधील बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन शाळेला उपयोगी पडणारे साहित्य देऊन दाताळा येथील माजी विद्यार्थ्यानी नाविन्यपूर्ण समाजासमोर आदर्श निर्माण केला.

दाताळा येथील जि.प.शाळा ही पंचक्रोशीतील एकमेव शाळा असल्यामुळे या शाळेतून अनेक विद्यार्थ्यी घडून विविध पदावर गेले आहेत. आपण या शाळेचे काही तरी ऋण व्यक्त करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी एकजूट दाखवून शाळेला उपयोगी असे शालेय साहित्य भेट दिली आहे. या शाळेत पहिली ते सातवी पर्यंत वर्ग असून,या शाळेमध्ये  शेतकरी व शेतमजूरांची मुले शिक्षण घेत असतात. 

प्रथम शाळेच्या इ.स.१९९०-९५ मधील बॅचच्या माजी विद्यार्थ्याचा एक व्हाटसप  ग्रूप  तयार करून सर्वांना शाळा सुधारण्या संदर्भात ग्रुप वर चर्चा करून सर्वाच्या पसंतीनुसार आर्थिक मदत करण्याचे  ठरविण्यातआले. यास प्रतिसाद म्हणून प्रा. विनायक शिंदे, प्रा. बळवंत शिंदे ,बाबूराव कोपरे, पुणे येथील नागोराव भुरे, औरंगाबादचे कामगार नेते दिगंबर शिंदे, लातूरचे एकनाथ पांचाळ, दशरथ मोरे, संतोष कोपरे तसेच विठ्ठलराव खानसोळे यांनी भरघोस मदत केली. या शाळेचे माजी विद्यार्थी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबादचे उपप्राचार्य प्रा. मि. गो. शिंदे तसेच माऊली हॉस्पीटलचे डॉ. शिवाजीराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंडवाना विद्यापीठाचे प्रा. विनायक शिंदे, शा.त.चे प्रा. बळवंत फुलवळे, नरंगले ॲकडमीचे प्रा. प्रकाश नरंगले व महावितरणचे कंत्राटदार बाबुराव कोपरे हे काम पाहत आहेत.

या मदतीतून शाळेच्या प्रत्येक वर्गात दोन फॅन, दोन ट्युबलाईट बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक वर्गात एक ग्रीन बोर्ड बसविण्यात  आला आहे.त्याचबरोबर संपूर्ण शाळेचे वायरींगचे  काम करून  घेण्यात आले. शाळेत एक विद्युत घंटी बसविण्यात आली आहे. लवकरच शाळेस शैक्षणिक व खेळाचे साहित्य, नवोदय व स्कॉलरशिप परीक्षेची पुस्तके तसेच प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांना बसण्यासाठी डेस्क( बेंच)  उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

याकामी शाळेचे मुख्याध्यापक पवळे, शालेय समितीचे अध्यक्ष विश्वनाथ शिंदे, सरपंच संजय फुलवळे ग्रामपंचायत सदस्य प्रदीप शिंदे हे व्हाट्सअप वरील शाळेतील माजी विद्यार्थी मित्रांनी शाळेला दिलेल्या भेटीवर नियंत्रण ठेवून शाळेला मिळालेल्या वस्तूवर जातीने लक्ष ठेवत आहेत. समन्वयक म्हणून माजी ग्रंथपाल जीवन शिंदे हे काम पहात आहेत. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या भेटी संदर्भात पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये  सर्व गावकऱ्यांकडून माजी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे..

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी