जिल्हाधिकारी यांनी हदगाव तहसिल कार्यालयास भेट देवुन ई- पीक पाहणी -NNL


हदगाव, शे चांदपाशा।
नादेड जिल्ह्याचे नवे जिल्हाअधिकारी आभिजित राऊत यांनी पुर्वसंध्येला हदगाव कार्यालयास भेट देवून कार्यालयात कामकाजाची तपासणी केली अस तहसिल कार्यालय द्वरे जारी केलेल्या प्रसिद्धी पञकात म्हटले आहे.

दि 22 नोव्हेंबर च्या पञकात म्हटले आहे की, जिल्हाअधिकारी यांनी कार्यालयीन कामाची पाहणी करुन कार्यालय संबंधी सुचना देवून त्यांच्या शाखेतील विभागाकडुन सर्व अभिलेखे व नोंद वह्या व संबंधित कर्मचाऱ्यांशी संवाद केला व मार्गदर्शन के. तसेच नादेडकडे जातांना त्यांनी एका शेतात जावुन रब्बी पिकाची ई-पीक पाहणी करुन या बाबतीत मार्गदर्शन केले असल्याचे प्रसिद्धी पञकात म्हटले आहे यावेळी हदगाव तालुक्याचे उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसालदार जीवराज डापकर मंडळ निरक्षक अरुण गिते, अव्वल कारकून एस एस हाक्के, तलाठी मुगल प्रफुल्ल ठाकरे यावेळी उपस्थित होते .

जिल्हाअधिकारी यांचा दौरा...
जिल्हाआधिकारी यांचा दौरा संबधी स्थानिक प्रशासनाने स्थानिक माध्यमांना काहीच माहीती दिली नव्हती विशेष म्हणजे जिल्हाअधिकारी अभिजित राऊत यांनी नादेड जिल्हा प्रशासनाची सुञे हाती घेतल्यानंतर प्रथमच त्यांचा दौरा हदगाव तालुक्यात होता जर स्थानिक प्रशासनाने या दौऱ्यासंबधी आगोदरच माध्यमाना माहीती दिली आसती तर पंतप्रधान सन्मान योजना पीकविमा अतिवृष्टी अनुदान आदी संबंधी माहीती जिल्हाअधिका-याकडु घेतली असती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी