देशाच्या प्रथम महिला पंतप्रधान भारतरत्न श्रीमती इंदिरा गांधी -NNL


भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान आणि पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ ला उत्तर प्रदेश मधील अलाहाबाद शहरातल्या नेहरू कुटुंबात झाला.त्यांना देशसेवेचे बाळकडू लहानपणीच वडील जवाहरलाल व आई कमला नेहरू यांच्याकडून मिळाले होते.त्यांचे वडील जवाहरलाल नेहरू आणि आजोबा मोतीलाल नेहरू होते. जवाहरलाल नेहरू आणि मोतीलाल नेहरू दोघीही वकील होते. भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव कमला नेहरू होते. इंदिरा गांधी ही कमला नेहरू व जवाहरलाल नेहरू यांची एकुलती एक कन्या होती.

त्यांचे वडील, जवाहरलाल नेहरू हे ब्रिटीश राजवटी विरोधातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख नेते होते आणि पुढे ते भारताच्या अधिराज्याचे आणि नंतर प्रजासत्ताक पहिले पंतप्रधान बनले.नेहरू दाम्पत्याच्या एकुलत्या एक कन्या होत्या.त्यांना एक लहान भाऊ होता जो लहानपणीच मरण पावला होता.आई कमला नेहरू यांच्या सोबत अलाहाबादमधील आनंद भवन येथे इंदिरा मोठ्या झाल्या. त्यांचे बालपण एकाकी आणि दुःखी होते. वडील जवाहरलाल नेहरू हे अनेकदा दूर असायचे.जवाहरलाल नेहरू नेहमी राजकीय कामात व्यस्त असत. त्यामुळे कुटुंबासोबत त्यांना जास्त वेळ घालवता येत नसे. याशिवाय कमला नेहरू यांचे स्वास्थ खराब राहत असे.तर त्यांची आई नेहमी आजाराने अंथरुणाला खिळलेली होती पुढे त्यांचा क्षयरोगामुळे लवकर मृत्यू झाला.

श्रीमती इंदिरा गांधी सुरुवातीपासूनच स्वातंत्र्यसंग्रामात सक्रिय होत्या. बालपणी त्यांनी ‘बाल चरखा संघ’ स्थापन केला आणि असहकार चळवळी दरम्यान कॉंग्रेस पक्षाच्या मदतीकरिता १९३० मध्ये लहान मुलांच्या साथीने वानर सेना देखील उभी केली होती. सप्टेंबर १९४२ साली त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. १९४७ साली श्रीमती इंदिरा गांधी यांनी महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीतील दंगलग्रस्त भागात काम केले. 

त्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या होत्या.इंदिरा गांधी हे एक महान महिला नेतृत्व होते. त्यांची हुशारी आणि राजकीय कार्यक्षमता याचे सर्वजण कौतुक करत असत.विविध विषयात रुची ठेवणाऱ्या श्रीमती इंदिरा गांधी आयुष्याला एका निरंतर प्रक्रीयेच्या रुपात पाहत असत. ज्यामध्ये काम आणि आवड हे त्याचे वेगवेगळे पैलू आहेत. त्यांनी आपल्या जीवनात अनेक क्षेत्रात लौकिक प्राप्त केला.

इंदिरा गांधी तरुण वयात काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्यांचे जीवन स्त्रियांसाठी प्रेरणादायी होते.कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता बिनधास्तपणे समाजात बदल घडवून आणण्यासाठी त्या बेधडकपणे निर्णय घ्यायचे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी असेच अभूतपूर्व निर्णय घेतले होते.इंदिरा गांधी ह्या स्वातंत्र्यपूर्व भारतीय लढ्यात तसेच पहिल्या महिला पंतप्रधान होत्या.त्यांचे जीवन आज प्रत्येक  महिलांसाठी प्रेरणादायी आहे.त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन...

-श्रीकांत संभाजी मगर, नांदेड.  ९६८९११७१६९

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी