अर्धापुरात शरद युवा संवाद यात्रेला प्रतिसाद, जिल्ह्यात कांग्रेसने आघाडीचा धर्म पाळावा शेख महेबुब..NNL

युवा मेळावा उत्साहात.


अर्धापूर, निळकंठ मदने|
जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कांग्रेसने आघाडीचा धर्म पाळुन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सन्माची वागणुक द्यावी.आसे न झाल्यास त्याचे परिणाम राज्यातील इतर जिल्हात दिसून येतील.जिल्हातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना ज्येष्ठ नेत्यांना सांगणार आहे.येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसेचे प्रदेशाध्यक्ष शेख महेबुब यांनी रविवारी (ता २०) शरद युवा संवाद यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात केले.या मेळाव्यास खूप मोठा प्रतिसाद मिळाला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या शरद युवा संवाद यात्रेला अर्धापुरात खूप मोठा प्रतिसाद मिळाला.शहरासह  तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.यूवकांचा मेळाव्याचे आयोजन शहरातील मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शेख महेबुब चंदन पाटील नागराळकर, जिल्हा निरीक्षक निषांत वाघमारे जिल्हा अध्यक्ष धनंजय सुर्यवंशी,नगरसेवक शेख जाकेर, उध्दवराव राजेगोरे, माजी तालुकाध्यक्ष शशी पाटील क्षिरसागर,अॅड सचिन देशमुख, अजिंक्य राजे देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत टेकाळे, राष्ट्रवादी युवक कांग्रेस भोकर विधानसभा अध्यक्ष आत्माराम पाटील कपाटे,मोहम्मद दानिश, अंबादास जोगदंड, सुनील धुमाळ, बाळासाहेब सोनकांबळे, संभाजी सूर्यवंशी आदी उपस्थित होते.तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

या मेळाव्याचे प्रास्ताविक आत्माराम कपाटे यांनी करून तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा सादर केला. यावेळी मार्गदर्शन करताना शेख महेबुब म्हणाले की राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांनी देशातील युवकांना रोजगार मिळावा, महिलांचा सन्मान वाढावा यासाठी धोरणे आखून त्याची अंमलबजावणी केली.शेतमालाल चांगला भाव मिळावा यासाठी निर्णय घेतली.सध्याचे केंद्र व राज्यातील सरकार जनविरोधी सरकार असुन यूवकांच्या हातातील रोजगार गेला, शेतमालाला दाम मिळत नाही, महागाई दररोज उच्चांक गाठत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आधिच्या सरकारने काय केले आसे म्हणतात. पण ते हे विसरतात की त्यांनी  ज्या रेल्वे स्थानकात चहा विकला  ते स्थानिक त्यांच्या आधिच्या सरकारने तयार केले आहे.त्यांच्या आठ वार्षाच्या काळात किती सार्वजनिक उद्योगांची उभारणी झाली, किती युवकांना रोजगार मिळाला याचा हिशेब द्यावा. 

जनविरोधी सरकारला धडा शिकविण्यासाठी युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येणे ही काळाची गरज आहे असे आवाहन शेख महेबुब यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष पवन इंगोले, शहराध्यक्ष संदिप राऊत, महंमद दानिश ज्योती सोनटक्के, दत्ता पारवे, शेख मुजीब, अभिजित पांचाळ, आकाश कपाटे, मारोती कदम, दत्ता नवले, बालाजी गोरे,महेंद्र सरोदे कोंडिबा देशमुख ,कानबा पवार, एजाज बेग प्रयत्न केले कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन शेख अमीर यांनी तर आभार यांनी मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी